छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून ‘देवमाणूस’ला ओळखले जाते. ‘देवमाणूस’ या मालिकेने ऑगस्ट २०२१ ला प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर काही महिन्यातच सुरु झालेल्या या मालिकेच्या दुसऱ्या पर्वानेही प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. देवमाणूस या मालिकेला पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. आता ही मालिका एका विलक्षण वळणावर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत विविध ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.

देवमाणूस २ या मालिकेत नुकतंच एका नवीन व्यक्तिरेखेची एंट्री झाली आहे. इन्स्पेक्टर मार्तंड जामकर असे या पात्राचे नाव आहे. देवमाणूस या मालिकेत अजितकुमारला कोणाचाही धाक नाही, असं वाटत असतानाच आता इन्स्पेक्टर मार्तंड जामकर यांची मालिकेत एंट्री झाली. त्यानंतर मालिकेत एक रंजक वळण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मार्तंड जामकर हा अजित कुमारची विविध पद्धतीने चौकशी करताना दिसत आहे. त्यामुळे तो अजितकुमारचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार कि नाही हे पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

“आमिर खानसोबतचा तो किसिंग सीन करताना…”, करिश्मा कपूरने सांगितला किस्सा

येत्या काही भागात मार्तंड जामकर हा अनेकांची चौकशी करताना दिसणार आहे. अजितला या गावातील काहींची साथ असणार असा संशय जामकरला आला आहे. त्याला बज्या, नाम्या आणि डिंपल या तिघांवर शंका आहे. या तिघांपैकी कोणीतरी अजितला मदत करत असेल, असे त्याला वाटत आहे. त्यामुळे तो नाम्या आणि बज्याची चौकशी करतो. पण ते दोघेही यात सहभागी नसल्याची त्याची खात्री होते.

त्यानंतर तो आपला मोर्चा डिंपलकडे वळवतो. एक सेलिब्रिटी म्हणून तिला फोटो काढण्याच्या बहाण्याने तो पोलीस स्टेशनला घेऊन जातो आणि दिवसभर बसवून ठेवतो. यामुळे अजित हा खूप अवस्थ असल्याचे दिसत आहे. डिंपलने जर तोंड उघडलं तर जामकरला पुरावे सापडतील. पण डिंपल मात्र तोंड उघडत नाही आणि याचा फायदा घेऊन अजित गावभर पसरवतो की देवमाणसाच्या पत्नीला नव्या पोलीस अधिकाऱ्याने दिवसभर स्टेशनमध्ये बसवून ठेवलं आणि तिला त्रास दिला. यामुळे गावात जामकर विरोधात चर्चा सुरू होते.

रुग्णालयातून परतलेल्या मुमताज यांनी सांगितले आजाराचे कारण, म्हणाल्या “२५ वर्षांपूर्वी स्तनाच्या कर्करोगामुळे…”

ही चर्चा सुरु झाल्यानंतर जामकर हा प्रायश्चित्त म्हणून त्या दोघांना घरी जेवायला येण्याचे आमंत्रण देतो. पण त्याच वेळेला अजितला जमिनीसाठी आमदाराचं बोलावणं येतं. आता दोघांपुढे नेमकं कुठे जायचं ह्याचा पेच पडतो. ते दोघे जामकारच्या घरी जातात पण त्यांना आमदारकडे जायचंय म्हणून दोघेही अस्वस्थ आहेत. जामकर त्यांना जेवण वाढतो आणि म्हणतो की साग्रसंगीत जेवण केलं आहे. तुमच्यासाठी साग्र झालं आता संगीत हवं असं म्हणून दोघांसाठी गाणं म्हणून डान्स करायला लागतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकीकडे अजित, डिंपल घाबरलेले असतात. तर दुसरीकडे यात जामकारचा काही डाव तर नसेल ना? जामकरचा हा पाहुणचार अजित आणि डिंपलला महागात तर पडणार का? याची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.