Devo Ke Dev Mahadev Actress Sonarika Bhadoria Announced Pregnancy : ‘देवों के देव… महादेव’ या मालिकेत देवी पार्वतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनारिका भदोरिया हिचे लग्न फेब्रुवारी २०२४ मध्ये झाले. राजस्थानमधील नाहरगढ पॅलेसमध्ये एका भव्य समारंभात या जोडप्याने लग्न केले. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गुड न्यूज दिली आहे.

अभिनेत्रीने बेबी बंप फ्लॉन्ट करत काही फोटो शेअर केले आणि ती आई होणार असल्याची बातमी दिली. लग्नानंतर जवळपास दीड वर्षांनी त्यांनी ही आनंदाची बातमी दिली. सोनालीने विकास पराशरशी लग्न केले. हे जोडपे लवकरच पालक होणार आहे.

सोनारिकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे गरोदरपणाची घोषणा केली. १४ सप्टेंबर रोजी, सोनारिकाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर विकासबरोबर पांढऱ्या लेस बॉडीकॉन ड्रेसमध्ये बेबी बंप दाखवणारे फोटो शेअर केले. तिने पोस्टला कॅप्शन दिले, “आमचे आतापर्यंतचे सर्वात मोठे साहस.” या बातमीनंतर, सोनारिकाचे चाहते खूप उत्साहित आहेत आणि ते तिचे खूप अभिनंदन करत आहेत.

सोनारिकाने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, २०२४ मध्ये विकासशी लग्न करण्यापूर्वी तिने त्याला सात वर्षे डेट केले होते. लग्नानंतर ई-टाइम्सशी बोलताना ती म्हणाली होती, “आम्ही याबद्दल अनेकदा बोलत राहतो, जेणेकरून आम्हाला असे वाटू नये की आम्ही विवाहित आहोत. ही भावना अजून आलेली नाही. मला वाटते की आम्हाला ते अजून कळलेले नाही, आम्ही इतके दिवस एकत्र आहोत.”

ती पुढे म्हणाली, ‘एके दिवशी मी माझ्या मावशीच्या घरी जेवायला गेले होते आणि माझी मावशी म्हणाली की तुम्हा दोघांना पाहून असे वाटत नाही की तुम्ही विवाहित जोडपे आहात. मी आनंदी आहे आणि आशा आहे की हे असेच चालू राहील.’

सोनारिकाची ओळख विकासशी जिममध्ये झाली. विकास हा सोनारिकाच्या भावाचा मित्र होता. येथूनच त्यांच्या नात्याला सुरुवात झाली. सोनारिका भदोरियाने २०११ मध्ये ‘तुम देना साथ मेरा’ या शोमधून टेलिव्हिजनवर पदार्पण केले. पण, ‘देवों के देव… महादेव’ या शोमध्ये देवी पार्वतीच्या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिच्या चेहऱ्यावरील निरागसतेने प्रेक्षकांना खूप आकर्षित केले.