छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत गायकवाड घराण्याची धाकटी सून नंदिता वहिनीची व्यक्तिरेखा साकारणारी धनश्री काडगांवकर अल्पावधीत घराघरात प्रसिद्ध झाली आहे. राणा व अंजलीच्या प्रेमात नेहमी अडथळा आणणाऱ्या या नंदिता वहिनीचा एक लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोत धनश्रीचा ‘रॉकिंग’ अंदाज पाहायला मिळत असून तिला ओळखणंही कठीण झालं आहे.
एका पार्टीसाठी धनश्रीने ही वेशभूषा केली होती. सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट होताच चाहत्यांकडून त्यावर लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पडत आहे. धनश्री ही मालिकेत जरी पारंपरिक पोशाखात दिसत असली तरी खऱ्या आयुष्यात ती ग्लॅमरस आहे.
अनेक मालिका व चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारणारी धनश्री ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील खलनायिकेच्या भूमिकेमुळे चांगलीच चर्चेत आली. भूमिकेसाठीचा आवश्यक असलेला कडकपणा पुरेपूर उतरवायचा तर त्यासाठी आपल्या फिटनेसकडेदेखील तितक्याच कडकपणे लक्ष केंद्रित करावं लागतं आहे, असं धनश्री सांगते. त्यामुळे व्यग्र वेळापत्रकातून ती फिटनेससाठी पुरेसा वेळ नक्की काढते.