प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून प्रवीण तरडे यांना ओळखलं जातं. ‘धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे’, ‘सरसेनापती हंबीरराव’ असे त्यांचे एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाले. त्यांच्या या चित्रपटांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मध्यंतरी ते कामामधून निवांत वेळ मिळाल्यानंतर पत्नी स्नेहल तरडेबरोबर लंडन येथे फिरण्यासाठी गेले होते. प्रवीण तरडे शेती या विषयावर कायमच मनमोकळेपणाने बोलत असतात. सोशल मीडियावर देखील ते सक्रिय असतात. नुकताच त्यांनी स्वतःचा एक फोटो आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे

प्रवीण तरडे यांनी आपला एक जुना फोटो शेअर करत त्यावर कॅप्शन दिला आहे की ‘अण्णाभाऊंचा फकिरा असाच दिसत असेल’? यावर नेटकऱ्यांनी होकाररार्थी कॉमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहले आहे की ‘फकिरा साकारायची ताकद फक्त आणि फक्त तुमच्यात आहे’. तर दुसऱ्याने लिहलं आहे, ‘फकिरा तूच करू शकतोस’. अनेकजणांनी ‘फकिरा’ या व्यक्तिरेखेवर चित्रपट बनवा अशी विनंती प्रवीण तरडे यांच्याकडे केली आहे.

all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी

दक्षिणेतील राज्यांमध्ये ब्रह्मास्त्रचा डंका! अवघ्या दोन दिवसात ‘इतक्या’ कोटींची कमाई

प्रवीण तरडे यांनी ज्या फकिरा व्यक्तिरेखेचा उल्लेख केला आहे ती नेमकी कोण आहे तर ‘फकिरा’ ही अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली मराठी भाषेतील कादंबरी आहे. ही कादंबरी इ.स. १९५९ साली प्रकाशित झाली. इ.स. १९६१ मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार या कादंबरीला मिळाला. या कांदबरीत ‘फकिरा’ नावाच्या तरुणाचे कथानक मांडले आहे. ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारा ‘फकिरा’ आणि त्याची शौर्यगाथा सांगणारी उत्तम अशी ही कादंबरी आहे.

प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’या चित्रपटाने विक्रमी कलेक्शन केले होते. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात ८.७१ कोटींची कमाई केली होती. अनेक चित्रपट समीक्षक, प्रेक्षक या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत होते. या चित्रपटात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वत: प्रवीण तरडेंनी साकारली आहे.