अभिनेत्री दिया मिर्झाच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालंय. दियाने एका मुलाला जन्म दिला आहे. दियाने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर करत मुलाच्या जन्माची बातमी चाहत्यांसोबत शेअर केलीय. खरं तर दियाने १४ मेला म्हणजेच दोन महिन्यांपूर्वाच मुलाला जन्म दिला आहे. दियाचं बाळ प्रीमँच्युअर म्हणजे वेळे आधीच जन्माला आलं होतं. त्यानंतर दोन महिन्यांपासून ते आयसीयूमध्ये आहे.

मुलाच्या जन्मानंतर दोन महिन्यांनी दियाने इन्स्टाग्रामवरून ती आई झाल्याची गोड बातमी शेअर केलीय. दिया आणि वैभवने त्यांच्या मुलाचं नाव अव्यान आझाद रेखी असं ठेवलं आहे. या पोस्टमध्ये दिया बाळासाठी चिंतेत असल्याचं दिसून आलं. दियाने तिच्या पोस्टची सुरुवात एलिजाबेथ स्टोन यांच्या काही ओळींनी केलीय. त्यानंतर ती म्हणाली ” आमचं काळीज असेल्या आमच्या मुलाचा अव्यान आझादचा जन्म १४ मेला झालाय. तो लवकर आला. त्यानंतर आमचा हा चिमुकला नवजात मुलगा आयसीयूमध्ये नर्स आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.” असं दियाने तिच्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.

हे देखील वाचा: ‘तिसऱ्या मुलाच्या’ नावावरून करीना कपूरच्या अडचणी वाढण्याची शक्यता!

दियाने तिच्या लवकर झालेल्या प्रसूतीबद्दलही पोस्टमध्ये लिहिलं आहे. “मला गरोदरपणात अचानक अ‍ॅपेंडेक्टॉमी आणि गंभीररित्या बॅक्टेरियल इंफेक्शन झालं. हे जीवघेणं ठरू शकलं असतं. नशीबाने आमच्या डॉक्टरांनी वेळेत काळजी घेत सी-सेक्शन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बाळाचा सुरक्षितरीत्या जन्म होवू शकला.” असं दियाने सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial)

हे देखील वाचा: पती राज कौशलच्या आठवणीत मंदिरा बेदी भावूक, मध्यरात्री शेअर केली ‘ही’ पोस्ट

दियाने तिच्या पोस्टमध्ये अनेकांचे आभार मानले आहेत. ” ती म्हणाली तुम्ही व्यक्त केलेली चिंता माझ्यासाठी नेहमीच महत्वाची ठरलीय. ही बातमी आधी शेअर करणं शक्य असतं तर आम्ही नक्की ती शेअर केली असती. तुम्हा सर्वांच्या प्रेमासाठी आणि आशिर्वादासाठी खूप आभार.” असं म्हणत तिने चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसंच मुलगा अव्यान लवकरच घरी येईल. त्याचे आजी-आजोबा, त्याची मोठी बहिण समायरा त्याला कुशीत घेण्यासाठी व्याकूळ आहेत असं दिया तिच्या पोस्टमध्ये म्हणाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेबी बंप सोबत फोटो शेअर करत दिया मिर्झाने ती गरोदर असल्याची माहिती सोशल मीडिया वरून दिली होती. पती वैभव रेखीसोबत लग्न गाठ बांधण्याआधीच दिया गरोदर असल्यामुळे सोशल मीडिया वरून तिच्यावर टीका करण्यात आली होती.