नुकताच मुंबईमध्ये ग्लोबल सिटिझन लाइव्ह इवेंट आयोजित करण्यात आला होता. या इवेंटमध्ये देश-परदेशातील बदलते वातावरण, गरिबी, न्याय अशा अनेक गोष्टींवर वक्तव्य करण्यात आले. या इवेंटला बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने हजेरी लावली असून तिने काही गोष्टींवर वक्तव्य केले. पण दियाने या इवेंटला हजेरी लावल्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे.

दियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या इवेंटशी संबंधीत एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवर एका यूजरने कमेंट करत ‘या इवेंटसाठी किती पैसे मानधन म्हणून घेतलेस’ असे म्हटले. त्या यूजरची कमेंट पाहून दिया संतापली आहे. ती शांत बसली नाही. तिने ट्रोलरला चांगलेच सुनावले आहे. तिने ‘काहीच घेतले नाही’ असे म्हणत त्या यूजरला सुनावले आहे.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
promote electric vehicles in India
भारतात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी तीन प्रस्ताव, कोणता ठरणार फायदेशीर?
sensex jumps over 500 points nifty close at 22217
Stock Market Today: ‘निफ्टी’ नवीन उच्चांकावर स्वार; ‘सेन्सेक्स’ची पाच शतकी मजल
AI killing tech jobs
AI मुळे नोकऱ्या जाणार की वाढणार? आयबीएम इंडियाचे प्रमुख काय म्हणतात नक्की वाचा!

तर दुसऱ्या एका यूजरने ‘माझा दियावर पूर्ण विश्वास आहे. ती अशा कलाकारांपैकी एक आहे जे केवळ बोलत नाही तर कृती करतात. मला तुझा अभिमान आहे’ अशी कमेंट करत दियाला पाठिंबा दिला आहे. आणखी एका यूजरने ‘तुम्ही खूप चांगले उत्तर दिले आहे’ असे म्हटले आहे.

या कार्यक्रमात दियासोबत अनिल कपूर, कियारा अडवाणी, जान्हवी कपूर, सारा अली खान या कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. तसेच बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने देखील सहभाग घेतला होता.