यंदा ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला. गाण्याला पुरस्कारासाठी नामांकन मिळाल्यानंतर चित्रपटाची टीम अंतिम सोहळ्यासाठी पोहोचली होती. दरम्यान, टीममधील ज्या सदस्यांनी अंतिम सोहळ्यात हजेरी लावली होती, त्यांनी सोहळ्यातील एंट्री म्हणून २० लाख रुपये भरल्याचं म्हटलं जात होतं. आता यासंदर्भातील सत्य समोर आलं आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट…” नागराज मंजुळे स्पष्टच बोलले

दिग्दर्शक एसएस राजामौली, ज्युनिअर एनटीआर, राम चरण, उपासना कामिनेनी, संगीतकार किरावानी, कालभैरव, चंद्रबोस व राहुल सिपलीगुंज हे सर्वजण ऑस्कर सोहळ्याला उपस्थित होते. दरम्यान, एका अहवालात असं म्हटलं होतं की केवळ चंद्रबोस आणि एमएम कीरावानी आणि त्यांच्या जोडीदारांना ऑस्करसाठी फ्री तिकिटं देण्यात आली होती. एसएस राजामौली, राम चरण, ज्युनियर एनटीआर यांना अंतिम कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रत्येकी सुमारे २५ हजार डॉलर्स म्हणजेच २० लाख रुपये द्यावे लागले होते.

“माझी निवड जवळपास झाली होती पण…” आर्चीच्या भूमिकेबद्दल ‘घर, बंदूक, बिरयानी’ फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हायरल दाव्याबद्दल ‘इंडिया टुडे’ने आरआरच्या टीमशी संपर्क साधला आणि याबद्दल विचारणा केली. त्यावर हे वृत्त खोटे असल्याचं टीमने सांगितलं. या पुरस्कार सोहळ्यात ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँगचा पुरस्कार मिळाला, तर ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या शॉर्ट फिल्मलाही पुरस्कार मिळाला.