बॉलीवूडचे दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. दिलीप कुमार (९०) यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना याच आठवड्यात घरी पाठवण्यात येण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, रुग्णालयात असतानाच आपल्या प्रकृतीत सुधार व्हावी यासाठी प्रार्थना करणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांचेही त्यांनी मनापासून आभार मानले आहेत. यांसंबंधीचे ट्विट आणि व्हिडीओ ट्विटर या सोशल साइटवर टाकण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे दिसते.
तब्बल सहा दशके आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीवर वर्चस्व गाजवणाऱ्या दिलीप कुमार यांनी आत्तापर्यंत ६० हिंदी चित्रपटांमधून काम केले आहे.