बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट ३ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटासाठी २५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात अक्षय हा ‘सम्राट पृथ्वीराज’ यांच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन १५ दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप या चित्रपटाने म्हणावी तशी कमाई केलेली नाही. हा चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

नुकतंच चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सम्राट पृथ्वीराज फ्लॉप ठरण्याबाबत भाष्य केले. यावेळी चंद्रप्रकाश द्विवेदी म्हणाले, “या चित्रपटाची कथा सनी देओलला डोळ्यासमोर ठेवूनच लिहिली गेली होती. १८ वर्षांपूर्वी ते स्वत: या चित्रपटाची निर्मिती करणार होते. पण त्यावेळी त्यांना पाठिंबा मिळाला नाही आणि आता या चित्रपटाला राजकीय लक्ष्य केले गेले आहे. हेच त्याच्या अपयशाचे मोठे कारण आहे.”

“या प्रवासात काही अतिशय खडतर क्षण आले पण…”, ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“अनेक इतिहासकारांनी या चित्रपटावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असते किंवा त्याची कथा सांगितली असती तर मला ते खूप आवडले असते. पण आता तुम्हाला माझ्या मते ती कथा ऐकायची नसल्यामुळे त्यांनी ते ऐकण्यास टाळाटाळ केली. हे पूर्णपणे चुकीचे आहे. इतिहास तसा चालत नाही”, असे चंद्रप्रकाश द्विवेदी म्हणाले.

त्यापुढे सम्राट पृथ्वीराज या चित्रपटाबद्दल चंद्रप्रकाश द्विवेदी म्हणाले की, “आम्ही लोकांचा मूड समजून घेण्यात अपयशी ठरलो. आम्ही हा चित्रपट फार मोठ्या प्रमाणावर बनवला होता. पण लोक त्या चित्रपटाशी जोडू शकले नाहीत. त्यांचे काय चुकले ते मला अजूनही समजत नाही. लेखकांनी आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे केले. आम्ही इतिहासातील कोणत्याही गोष्टींसोबत काहीही छेडछाड केलेली नाही. आम्ही ही जबाबदारी चांगल्या प्रकारे समजून घेत आहोत.”

“मी राजू शेट्टींचा खूप मोठा चाहता, त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी”, प्रवीण तरडेंनी केले कौतुक

‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटात अक्षय कुमारची मुख्य भूमिका होती. यात त्याच्यासोबत मानुषी छिल्लर, संजय दत्त, सोनू सूद, आशुतोष राणा आणि साक्षी तन्वर यांच्या भूमिका आहेत. दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी बनवलेल्या या चित्रपटाचे बजेट ३०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. यशराज फिल्म्सने याची निर्मिती केली आहे.