सध्या ‘मलंग’ चित्रपटामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे दिशा पटाणी. दिशा सोशल मीडियावर सतत तिचे फोटो शेअर करत असते. नुकताच ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या तीन अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. या नावांमध्ये दिशा पहिल्या स्थानवर आहे. तिने बॉलिवूडची मस्तीनी दीपिका पदूकोण आणि देसी गर्ल प्रियांका चोप्रा यांना देखील लोकप्रियतेच्या बाबतीत मागे टाकले आहे.
स्कोर ट्रेंड्स इंडियाने जाहीर केलेल्या यादीमध्ये दिशाने १०० अंकांनी पहिले स्थान पटकावले आहे. तर ९८ अंकांनी प्रियांका चोप्रा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच दीपिका ८४ अकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ही लोकप्रियतेची आकडेवारी अमेरिकेची मीडिया टेक कंपनी, स्कोर ट्रेंड्स इंडियाने जाहिर केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिशा सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या बोल्ड फोटोंमुळे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असल्याचे म्हटले जात आहे. तिच्या चाहत्यांमध्ये युवक वर्गाची संख्या जास्त आहे. तसेच तिच्या पोस्टरवच्या प्रतिक्रिया पाहता येत्या काही काळाता दिशाची लोकप्रियता आणखी वाढण्याची चिन्हे दिसत असल्याची माहिती स्कोर ट्रेंड्सच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रियांकाच्या ट्विटरवर परदेशी चाहत्यांच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर आहेत.
View this post on Instagram
दीपिकाने एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिल्यामुळे तिच्या फॉलोअर्सची संख्या खूप वाढली आहे. दीपिकाचे ट्विटरवर २६.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर प्रियांका चोप्राच्या फॉलोअर्सची संख्या २५.६ मिलियन आहे. दिशा ट्विटरवर जास्त चर्चेत असली तरी तिच्या फॉलोअर्सची संख्या दीपिका आणि प्रियांकापेक्षा कमी आहे. तिचे केवळ ४ मिलियन फॉलोअर्स आहेत.