बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणी आजकाल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी गप्पा मारताना दिसते. दिशाने नुकताच तिचा एक वर्कआऊट व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच दिशा पटाणीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वर्कआऊटचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिशा ६० किलो वजन उचलताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ जवळपास २४ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

नुकताच दिशाच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सनी संख्या ४ कोटी पेक्षा जास्त झाली आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने नुकताच माझे ४ कोटी फॉलोअर्स झाले आहेत. तुम्हा सर्वांचे आभार असे पोस्टमध्ये म्हटले आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी दिशाचा ‘मलंग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर, कुणाल खेमू आणि अमृता खानविलकर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाने चांगली कमाई देखील. आता लवकरच दिशा सलमानच्या ‘राधे’ या चित्रपटात झळकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disha patani workout video avb
First published on: 24-09-2020 at 19:23 IST