अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करण्याच्या काही दिवसांपूर्वी त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केली होती. त्यामुळे सुशांत आणि दिशा या दोघांच्या आत्महत्येचा परस्परांशी काही संबंध आहे का याचा तपास सीबीआय करत आहेत. यात दिशाचे फोन कॉल्स डिटेल्स समोर आले आहेत. त्यानुसार, दिशाच्या मृत्यूनंतरही तिचा फोन सुरु असल्याचं ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तात म्हटलं आहे.

दिशाच्या मृत्यूनंतरही तिचा फोन सुरु होता. विशेष म्हणजे ९,१०,१५ आणि २० अशा ठराविक दिवशी दिशाचा फोन अॅक्टीव्ह करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच या फोनचं इंटनेटदेखील सुरु असल्याचं तपासात समोर आलं आहे. परंतु, हा फोन पोलिसांनी सुरु केल्याचं म्हटलं जात आहे. तपासाचा एक भाग म्हणून पोलिसांनी हा फोन सुरु केला होता. मात्र, या फोनवर आलेले फोन कॉल्स किंवा मेसेजचं त्यांच्याकडून कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नाही असंही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

वाचा : सुशांत सिंह मृत्यूप्रकरण : शिबानी दांडेकरने उलगडलं ‘त्या’ मिस्ट्री गर्लचं रहस्य

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिने सुशांतच्या काही दिवसांआधीच आत्महत्या केली होती. दिशाने इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती.