scorecardresearch

Premium

अंकिता लोखंडे आणि सुशांत राजपूतचे नाते अखेर संपुष्टात?

२००९ पासून सुशांत व अंकिता एकत्र असून गेल्या काही वर्षांपासून ते लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये आहेत.

Ankita Lokhande , Television, Sushant Singh Rajput, break up , rumours, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
Ankita Lokhande & Sushant Singh Rajput : ‘पवित्र रिश्ता’फेम अंकिता लोखंडेनही सगळे चांगले असून केवळ सुशांत सिंग राजपूतबरोबरच्या आपल्या नात्याबद्दल मनात सतत असुरक्षिततेची भावना असते म्हणून त्यातून बाहेर पडणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती.

टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या ब्रेकअपची चर्चा खरी ठरण्याची शक्यता आहे. अंकिताने काही दिवसांपूर्वी केलेली ट्विटस पाहता अंकिता आणि सुशांतचे नाते आता पूर्णपणे संपुष्टात आल्याचे संकेत मिळत आहे. इतक्या वर्षांत कुणीही मला स्वत:वर प्रेम कसे करायचे आणि ते महत्त्वाचे का असते, हे शिकवले नाही, असल्याचे अंकिताने या ट्विटसमध्ये म्हटले आहे.
.. म्हणून सुशांत राजपूत आणि अंकिता लोखंडेचा ब्रेकअप
गेले काही महिने बॉलीवूडमध्य ब्रेकअपचे वारे वाहत आहेत. बॉलिवूडमधील अनेक जोड्यांमध्ये या वर्षात दुरावा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ‘पवित्र रिश्ता’फेम अंकिता लोखंडेनही सगळे चांगले असून केवळ सुशांत सिंग राजपूतबरोबरच्या आपल्या नात्याबद्दल मनात सतत असुरक्षिततेची भावना असते म्हणून त्यातून बाहेर पडणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. त्यावेळी सुशांत सिंगने आमचे नाते कठीण परिस्थितीतून जात असल्याचे सांगत त्याबद्दल बोलण्याचे टाळले होते. तर अंकिताने एकमेकांपासून विभक्त होण्याच्या गोष्टी फेटाळून लावल्या होत्या. २००९ पासून सुशांत व अंकिता एकत्र असून गेल्या काही वर्षांपासून ते लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये आहेत. यावर्षीच्या अखेरीस हे दोघे लग्नदेखील करणार होते.
धुमसते ग्लॅमर 

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-04-2016 at 12:47 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×