scorecardresearch

रजनीकांत यांच्या मुलीचे दागिने चोरीप्रकरणी दोघांना अटक; ऐश्वर्याकडे १८ वर्षे काम करणाऱ्या मोलकरणीने कोट्यवधींचे दागिने विकून…

ऐश्वर्याने तिच्या चेन्नईच्या घरातील सोने आणि हिऱ्याचे दागिने चोरीला गेल्याचं तक्रारीत म्हटलं होतं.

Aishwarya Rajinikanth
(फोटो – इन्स्टाग्राम)

सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याचे दागिने घरातून चोरीला गेले होते. यासंदर्भात ऐश्वर्याने चेन्नईच्या तेनमपेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून घेतली होती. ऐश्वर्याने तिच्या चेन्नईच्या घरातील सोने आणि हिऱ्याचे दागिने चोरीला गेल्याचं म्हटलं होतं. याप्रकरणी आता दोघांना अटक करण्यात आली आहे.

वयाच्या चौथ्या वर्षापासून मोलकरणीने केला शारीरिक छळ; ‘मै नही तो कौन बे’ फेम सृष्टी तावडेचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “मी माझ्या पालकांना…”

पोलिसांनी मंगळवारी २१ मार्च रोजी ऐश्वर्याची मोलकरीण आणि ड्रायव्हरला अटक केली. त्यांनीच घरातून सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने चोरल्याचा आरोप आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्याच्या ड्रायव्हरचे नाव वेंकटेशन आहे, त्याच्या सांगण्यावरून मोलकरीण ईश्‍वरीने सुमारे १०० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि ३० ग्रॅम हिऱ्याचे दागिने तसेच चार किलो वजनाचे चांदीचे दागिने चोरले होते. महिलेने सर्व दागिने विकून त्यातून मिळालेले पैसे घर खरेदीसाठी वापरल्याचे पोलिसांनी सांगितले.

“आई-वडील ऑफिसला गेल्यावर मोलकरीण मला…” ‘मैं नही तो कौन बे’ फेम रॅपर सृष्टी तावडेचा लहानपणीच्या छळाबद्दल खुलासा

ईश्वरी १८ वर्षांपासून ऐश्वर्याच्या घरी मोलकरीण म्हणून काम करत होती. त्यामुळे तिला घराबद्दल संपूर्ण माहिती होती. यापूर्वी अनेकदा तिने चोरीचा प्रयत्न केला होता, कारण तिला लॉकरची चावी कुठे ठेवली जाते, ते माहीत होतं, असं पोलिसांनी सांगितलं. मोलकरणीने चोरी करून घर खरेदी केलं. या खरेदीशी संबंधित कागदपत्रेही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 10:55 IST

संबंधित बातम्या