लॉकडाउनमुळे रोजंदारी कामगार व इतर कर्मचाऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत जमेल तशी मदत प्रत्येकजण करण्याचा प्रयत्न करत आहे. करोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी सामान्यांपासून सेलिब्रिटींनी खारीचा वाटा उचलला आहे. त्यातच आता निर्माती एकता कपूर हिने तिचा वर्षभराचा पगार ‘बालाजी टेलिफिल्म्स’च्या कर्मचाऱ्यांना दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लॉकडाउनमुळे मनोरंजन क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. अनिश्चित काळासाठी सर्व शूटिंग बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ‘बालाजी टेलिफिल्म्स’च्या कर्मचाऱ्यांसाठी एकताने आर्थिक मदत केली आहे. एकता कपूरचा वर्षभराचा पगार २.५ कोटी रुपये इतका आहे. या संपूर्ण पगाराचं वाटप ती कर्मचाऱ्यांमध्ये करणार आहे.

आणखी वाचा : ‘दर महिन्याचं गणित जमवताना पोटात धडधडतंच आहे’; स्पृहा जोशीची पोस्ट

संकटं येतात आणि जातात, मात्र संकटकाळात जपलेली माणुसकी ही कायम लक्षात राहते. हीच माणुसकी बऱ्याच सेलिब्रिटींनी जपली आहे. अभिनेता अक्षय कुमारने तब्बल २५ कोटी रुपयांची मदत केली आहे. तर सलमान खान, शाहरुख खान, राजकुमार राव, कार्तिक आर्यन, विकी कौशल, लता मंगेशकर यांसारख्या असंख्य कलाकारांनी पुढाकार घेत आर्थिक मदत केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ekta kapoor to give one year salary to balaji telefilms employees ssv
First published on: 04-04-2020 at 14:01 IST