वनस्पतींचे विश्व फारच मोठे आहे. जगात अशा अनेक वनस्पती आहेत ज्या आपल्याला ठाऊकही नाहीत. सोनी बीबीसी याच संदर्भातील एक लक्षवेधक सिरीज घेऊन आली आहे, जी प्रेक्षकांना वनस्‍पती क्षेत्रामधील नवीन व उत्‍साहवर्धक शोधांच्‍या रोमांचपूर्ण राइडवर घेऊन जाणार आहे. रूपर्ट बॅरिंग्‍टन यांची निर्मिती असलेला हा शो माहितीपूर्ण कथानक व उल्‍लेखनीय कन्‍टेन्‍टच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्‍यासोबत त्‍यांना प्रेरित करण्‍याच्‍या दृष्टीकोनाच्‍या दिशेने सोनी बीबीसी अर्थचे आणखी एक पाऊल आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्‍या प्‍लॅनेट अर्थ सिरीजमध्‍ये अधिक भर करणाऱ्या या शोचे सुत्रसंचालन प्रसिद्ध जीवशास्‍त्रज्ञ, नैसर्गिक इतिहासकार आणि प्रसारक सर डेव्हिड अ‍ॅटनबरो करणार आहेत, जे वनस्‍पती कशाप्रकारे जगतात, वाढतात व बहरतात यासंदर्भात नवीन दृष्टीकोन सादर करतील. ५ एपिसोड्स असलेली ही सिरीज सोनी बीबीसी अर्थवर ११ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता सुरू झाली आहे.

जाणून घेऊया, बॉलिवूडच्या पहिल्या महिला सुपरस्टार परवीन बाबी यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी

प्रगत फिल्‍ममेकिंग तंत्रज्ञान व आधुनिक विज्ञानाचा वापर करत ही भव्‍य सिरीज वनस्पतींचे गुपित, न शोधण्‍यात आलेले जीवन, त्‍यांचा विकास आणि ते कशाप्रकारे वागतात व परस्‍परसंवाद साधतात याबाबत सखोल माहिती देते. प्रत्‍येक एपिसोड वाळवंट, उष्‍णकटिबंधीय जंगले आणि पाण्‍याखालील जगापासून हंगामी जमिनी आणि आपल्‍या शहरी वातावरणामधील वनस्‍पतींच्‍या समूहाला सादर करतो.

या सिरीजमधून प्रेक्षकांना वनस्‍पतींचा होणारा ऱ्हास, त्‍वनस्पती एकमेकांशी कशाप्रकारे संवाद साधतात, त्या केअरगिव्‍हर्स म्‍हणून कशाप्रकारे कार्य करतात आणि स्वतःच्या अस्तित्त्वासाठी कशाप्रकारे संघर्ष करतात, हे पाहायला मिळणार आहे. थर्मल व अल्‍ट्रा-हाय-स्‍पीड कॅमेरे, माक्रो फ्रेम-स्‍टॅकिंग आणि मायक्रोस्‍कोपीमधील आधुनिक विकास शोच्‍या व्हिज्‍युअल आकर्षकतेमध्‍ये अधिक भर करतात, ज्‍यामधून प्रेक्षकांना वनस्‍पती जगतातील अविश्‍वसनीय सौंदर्याचा अनुभव मिळेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Experience the unprecedented world of plants from sony bbc earth the green planet pvp
First published on: 12-04-2022 at 11:56 IST