अभिनेत्री प्रियांका आणि निकच्या बाळाची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक, मात्र व्हायरल फोटोमागील सत्य काय?

चाहत्या प्रियांका आणि निकच्या बाळाची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अशातच सोशल मीडियावर प्रियांका आणि निकचे एका नवजात बाळासोबतचे फोटोही व्हायरल झालेत.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने नुकतंच सरोगसीद्वारे आपल्या बाळाला जन्म दिला. त्यांनी याची माहिती सोशल मीडियातून चाहत्यांना दिली. यानंतर या जोडप्याच्या बाळाची जोरदार चर्चा होत आहे. त्यांचे चाहत्या या बाळाची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अशातच सोशल मीडियावर प्रियांका आणि निकचे एका नवजात बाळासोबतचे फोटोही व्हायरल झालेत. हे फोटो प्रियांका आणि निकच्या बाळाचे म्हणून मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. मात्र, या फोटोंमागील वास्तव काही वेगळंच आहे.

प्रियांका आणि निकने चाहत्यांना आपल्या बाळाच्या आगमनाची बातमी दिली असली तरी बाळ मुलगा आहे की मुलगी याबाबत काहीही माहिती दिलेली नाही. याशिवाय फोटोही पोस्ट केलेला नाही. अशातच प्रियांका आणि निकचा एक जुना फोटो त्यांचा आत्ताचा बाळासोबतचा म्हणून शेअर केला जातोय. सोशल मीडियावर अनेक जण यालाच खरं मानत आहेत. मात्र, प्रियांका आणि निक यांच्या कुशीत बाळ असलेले हे फोटो मोठा काळ प्रियांकाची स्टायलिस्ट राहिलेल्या दिव्या ज्योतीच्या मुलीसोबतचे आहेत.

हेही वाचा : प्रियांका चोप्रा आणि निक जोनसने बाळासाठी सरोगसीचा पर्याय का निवडला? समोर आले कारण

दरम्यान, प्रियांकाला सध्या फर्टिलिटीबाबत कोणतीही समस्या नाही. पण आता तिचे वय ३९ आहे आणि त्यामुळे बाळ होणे ही गोष्ट तिच्यासाठी फार सोपी गोष्ट नाही. तसेच त्यांच्या व्यस्त कामाच्या वेळापत्रकामुळे ही गोष्ट अधिक कठीण झाली असती. त्यामुळे अशा परिस्थितीत या जोडप्याने सरोगसीचा मार्ग निवडला, अशी माहिती बॉलिवूड लाईफने दिलीय.

निक आणि प्रियांका यांनी एका एजन्सीच्या मदतीने या महिलेची भेट घेतली. ही या महिलेची पाचवी सरोगसी आहे. हे दोघेही तिला भेटले आणि त्यांना ती आवडली. त्यानंतर त्यांनी याबाबतचा निर्णय घेतला. दरम्यान प्रियांका आणि निकच्या बाळाचा जन्म एप्रिलमध्ये होणार होता, मात्र प्री-मॅच्युअर डिलीव्हरी झाली आहे.

हेही वाचा : लग्नाच्या ३ वर्षांनंतर प्रियांकाने केलं ‘आई’ होण्यावर वक्तव्य, म्हणाली…

प्रियांका चोप्राशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचं बाळ २७ व्या आठवड्यात जन्माला आलं आहे. बाळ आणि सरोगेट आई कॅलिफोर्नियाच्या एका रुग्णालयात आहेत. नियोजनानुसार बाळाचा जन्म एप्रिल महिन्यात होणार होता. मात्र त्या आधीच त्याचा जन्म झाल्यानं बाळाला रुग्णालयातच ठेवण्यात आलं आहे. तसेच आणखी काही दिवस त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेण्यात येणार आहे. ते बाळ निरोगी झाल्यानंतरच या मुलाला ते तिच्या घरी आणणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fact check of viral photos of actress priyanka chopra and nick jonas with baby pbs

Next Story
अभिजित बिचुकले बिग बॉस १५ मधून बाहेर, हात जोडून राखी सावंत म्हणाली…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी