प्रसिद्ध तमिळ आणि मल्याळम अभिनेत्री अरुंधती नायर हिचा १४ मार्च रोजी अपघात झाला आहे. तिची बहीण आरती नायर हिने या बातमीची पुष्टी केली आहे. अरुंधती गंभीर जखमी झाली आहे आणि रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. ती सध्या त्रिवेंद्रममधील अनंतपुरी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर आहे. ती लवकर बरी व्हावी, यासाठी तिचे चाहते प्रार्थना करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, केरळमध्ये कोवलम बायपासवर हा अपघात झाला. या अपघातात अरुंधतीच्या डोक्याला दुखापत झाली आहे. १८ मार्च रोजी तिची बहीण आरतीने सोशल मीडियावर एक निवेदन शेअर केलं आहे. त्यात तिने अरुंधतीच्या अपघाताची माहिती दिली आहे. अपघात झाला तेव्हा अरुंधती तिच्या भावाबरोबर प्रवास करत होती. एका यूट्यूब चॅनलला मुलाखत देऊन ते घरी परतत होते. परतत असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.

madhoo relation with hema malini juhi chawla
माहेरी हेमा मालिनी तर सासरी जुही चावलाची नातेवाईक आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, “त्यांनी माझ्या पतीच्या…”
sakshi Tanwar
सीबीआय अधिकाऱ्याची लेक, IAS व्हायचं स्वप्न पण झाली अभिनेत्री; ५१ व्या वर्षीही अविवाहित ‘प्रिया’ आहे एका मुलीची आई
mugdha godbole shared angry post after kshitee jog receiving negative comments
“मंगळसूत्र घालावं की नाही?”, क्षिजी जोगच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या गलिच्छ कमेंट्स, प्रसिद्ध अभिनेत्री संतापून म्हणाली…
Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले

एकेकाळी ८० रुपये रोजंदारीवर केलं काम, बीडच्या तरुणाने उभारली १० कोटींची कंपनी, ‘शार्क टँक इंडिया’मध्ये झळकला

“हे खरं आहे की माझी बहीण अरुंधती नायर हिचा तीन दिवसांपूर्वी अपघात झाला. तिला गंभीर दुखापत झाली आहे आणि तिला त्रिवेंद्रममधील अनंतपुरी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. ती मृत्यूशी झुंज देत आहे,” असं आरतीने म्हटलं आहे.

“आम्हाला धर्माची पर्वा नव्हती,” २२ वर्षांपूर्वी मोडलेल्या लग्नाबाबत विंदू दारा सिंगचे विधान; तब्बूच्या बहिणीशी झाला होता विवाह

अरुंधतीने २०१४ मध्ये ‘पोंगी एझू मनोहरा’ मधून तमिळ सिनेमात पदार्पण केलं होतं. विजय अँटोनीच्या ‘सैथान’ चित्रपटामुळे तिला लोकप्रियता मिळाली. २०१८ मध्ये तिने ‘ओट्टाकोरू कामुकन’ मधून मल्याळम सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ती शेवटची २०२३ मध्ये आलेल्या ‘आईराम पोरकासुकल’ या तमिळ चित्रपटात दिसली होती.