‘शार्क टँक इंडिया’ चे तिसरे पर्व सुरू आहे. या शोमध्ये ताज्या भागात एक मराठी उद्योजक आला होता, त्याने शार्ककडून एक चांगली डील मिळवली. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील उद्योगक दादासाहेब भगत या तरुणाने शार्क टँक इंडियामध्ये त्याची ग्राफिक डिझायनिंग कंपनी ‘डिझाइन टेम्प्लेट io’ बद्दल माहिती दिली. त्याने २.५ टक्के भागीदारीच्या बदल्यात एक कोटी रुपयांची गुंतवणूक मागितली होती.

दादासाहेबने कंपनी उभारण्याची माहिती देताना सांगितलेल्या गोष्टीमुळे सर्व शार्क्स प्रभावित झाल्याचं पाहायला मिळालं. त्याने सांगितलं की तो इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करत होता आणि महिन्याला त्याला नऊ हजार रुपये पगार मिळत होता. त्याआधी तो रोजंदारीवर काम करायचा. त्याला दिवसाला ८० रुपये मजुरी मिळायची. पण डिझाईनिंगकडे कल असल्याने दादासाहेबने २०१८ मध्ये Design template.io ही कंपनी सुरू केली. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे १० वी नंतर शिकू न शकलेल्या दादासाहेबने १० कोटी रुपयांचा व्यवसाय उभारला आहे.

criminal case filed against former mayor in panvel
रेशनदूकानदाराला जाब विचारणाऱ्या माजी नगराध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल
point of view All India Entrance Exam presentation
ताणाची उलगड: स्वत:चा दृष्टिकोन बदला
foreign women prostitution, prostitution Kharghar,
वेश्याव्यवसायप्रकरणी परदेशी महिलांवर कारवाई
jharkhand marathi news, logistic company fraud
झारखंडमधील कंपनीची पावणेसहा कोटींची फसवणूक, लॉजिस्टीक कंपनीच्या तिघांविरोधात गुन्हा

“आम्हाला धर्माची पर्वा नव्हती,” २२ वर्षांपूर्वी मोडलेल्या लग्नाबाबत विंदू दारा सिंगचे विधान; तब्बूच्या बहिणीशी झाला होता विवाह

त्याच्या या प्रेरणादायी प्रवासामुळे शार्क खूप प्रभावित झाले आणि सर्वांनी दादासाहेबसाठी टाळ्या वाजवल्या. सर्वांनी त्याचं कौतुक केलं, राधिका गुप्ताने त्याच्या हिमतीला दाद दिली. नंतर सर्व शार्क्सनी त्याच्या व्यवसायाचे तपशील समजून घेतले आणि विनीता सिंह, रितेश अग्रवाल व राधिका यांनी गुंतवणूक करणार नसल्याचं सांगितलं. पण पीयूष बन्सलने दादासाहेबला १० टक्के भागीदारीच्या बदल्यात एक कोटी रुपयांची ऑफर दिली आणि २ कोटी रुपये परत मिळेपर्यंत रॉयल्टी मागितली.

“तिने मला जवळ ओढलं अन्…”, विजय वर्माने सांगितला सारा अली खानसोबत इंटिमेट सीन करण्याचा अनुभव

पीयूषची ऑफर ऐकल्यानंतर अमन गुप्ता म्हणाला की मी १० टक्के भागीदारीसाठी एक कोटी रुपये देतो आणि मला रॉयल्टी नको आहे. दादासाहेबने रॉयल्टी देण्याची गरज नाही, असं म्हणत अमनने पीयूषला टोला लगावला. यानंतर दादासाहेबने अमनबरोबर एक कोटी रुपयांच्या बदल्यात १० टक्के भागीदारी देऊन ऑफर स्वीकारली.