दाक्षिणात्य अभिनेत्री आपल्या अभिनयाने लूकमुळे चर्चेत असतात. सध्या बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा दाक्षिणात्य अभिनेत्रींचा बोलबाला आहे. अशीच एक अभिनेत्री अमला पॉल, जिने अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे. नुकतीच तिने केरळमधील एका हिंदू मंदिराला भेट देणार होती मात्र तिला मंदिरात प्रवेश नाकारला. मंदिरातील अधिकाऱ्यांनी तिला रोखले, असा आरोप अभिनेत्रीने केला आहे.

माध्यमांच्या माहितीनुसार केरळमधील एर्नाकुलम येथील तिरुवैरानिकुलम महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी सोमवारी गेली होती. ‘धार्मिक भेदभावामुळे तिला मंदिरात प्रवेश दिला नाही. या मंदिराच्या आवारात फक्त हिंदूंना परवानगी आहे. इतरांना दर्शन घेण्याची परवानगी नाही. नंतर अभिनेत्रीने दावा केला की तिला दर्शन नाकारण्यात आले आणि तिला मंदिरासमोरील रस्त्यावरून देवीचे दर्शन घेण्यास भाग पाडले.

Know the history behind the historic temple dedicated to Yamraj, which Kangana Ranaut visited
कंगना रणौतने निवडणुकीतील यशासाठी घातले साक्षात यमराजालाच साकडे; काय आहे गूढ यमराज मंदिराचा इतिहास?
Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”

Photos : हातात बंदूक, खाकी वर्दी; तब्बूचा ‘भोला’ चित्रपटातला लूक पाहिलात का?

अमलाने मंदिरातील एका रजिस्टरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने लिहले आहे की ‘हे दुःखद आणि निराशाजनक आहे की २०२३ मध्ये धार्मिक भेदभाव अजूनही अस्तित्वात आहे. मी देवीच्या जवळ जाऊ शकत नव्हते, पण दुरून दर्शन घेऊनही तिची अनुभूती येत होती. मला आशा आहे की धार्मिक भेदभावात लवकरच बदल होईल. अशी वेळ येईल जेव्हा धर्माच्या आधारावर नव्हे तर आपल्या सर्वांना समान वागणूक दिली जाईल. अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“गोळी तर खावी लागणार…” तब्बू पुन्हा एकदा साकारणार तडफदार पोलीस अधिकारी; ‘भोला’ चित्रपटातील लूक व्हायरल

या घटनेनंतर ज्या ट्रस्टद्वारे मंदिराचा कारभार चालवला जातो त्या ट्रस्टच्या विरोधात अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. ट्रस्टचे सचिव प्रसून कुमार म्हणाले, “अनेक धर्मातील भाविक मंदिरात दर्शनासाठी आले आहेत, परंतु हे कोणालाही माहिती नाही. मात्र, एखादी सेलिब्रिटी आली की ती वादग्रस्त ठरते. अमाला पॉलचा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला आहे. अमला पॉल ही दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तमिळमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत