बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर लवकरच लग्न करणार आहे. मागची काही वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर येत्या २१ फेब्रुवारीला हे दोघंही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं बोललं जात आहे. पण फरहाननं जेव्हा शिबानीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी त्यानं सर्वात आधी त्याच्या आईला सांगितलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फरहानची आई हनी इरानी यांनी फरहाननं कशाप्रकारे लग्नाची परवानगी मागितली होती याचा खुलासा केला.

फरहान अख्तरची आई हनी इराणी म्हणाल्या, ‘मी माझ्या मुलासाठी खूपच उत्साहित आहे. मागच्या बऱ्याच काळापासून मी या दिवसाची वाट पाहत होते. आता अखेर ते दोघं लग्न करत आहेत.जेव्हा फरहाननं शिबानीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी तो पहिल्यांदा माझ्याकडे आला होता आणि त्याचं शिबानीवर किती प्रेम आहे हे मला सांगितलं होतं आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती.’

Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
Madhuri Dixit cried ranjeet scene
विनयभंगाच्या सीनआधी खूप रडली होती माधुरी दीक्षित, काम करण्यास दिलेला नकार; प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितली आठवण
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर

हनी इरानी पुढे म्हणाल्या, ‘फरहान आणि शिबानी यांनी एकत्रच त्यांचा लग्नाचा निर्णय कुटुंबीयांनी सांगितला. त्या दोघांनीही सर्वांसाठी एक डिनर ठेवलं होतं. त्याचवेळी त्यांनी त्यांच्या लग्नाचा निर्णय आम्हाला सांगितला होता. ते दोघंही एकमेकांसोबत आनंदी आहेत. मी तर प्रार्थना करते की, दोघंही असेच आयुष्यभर एकमेकांसोबत आनंदी राहो. ते दोघंही एकमेकांबाबत खूपच गंभीर आहेत. त्यामुळे आम्ही देखील त्यांच्या लग्नाला परवानगी दिली.’