बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघेही गेल्या ३ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. हे दोघं २१ फेब्रुवारी रोजी कायदेशीर रित्या लग्न करणार आहे. पण आता अशी माहिती समोर आली आहे की त्याआधी हे दोघे महाराष्ट्रीय पद्धतीनुसार लग्नबंधनात अडकणार आहेत. फरहानच्या खंडाळा फार्म हाऊसवर हे लग्न करणार आहेत.

हिंदुस्तान टाइम्समध्ये दिलेल्या वृत्तानुसार, दोघेही २१ तारखेला लग्न करण्यापूर्वी फरहानच्या फार्म हाऊसवर १९ फेब्रुवारीला मराठी प्रथेनुसार लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नात फक्त त्यांचं कुटुंबीय आणि जवळचे मित्र असतील. फरहान आणि शिबानी यांच्या लग्नाचे फंक्शन कसे पार पडणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात

आणखी वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मध्ये जेसिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण?

दोघांचे कुटुंब १८ फेब्रुवारीला संध्याकाळी खंडाळ्याला रवाना होणार आहेत. तर लग्नाच्य कार्यला त्यानंतर सुरुवात होईल. शिबानीची बहीण अनुषा दांडेकर आणि तिच्या जवळच्या मैत्रिणींनी १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बॅचलर पार्टी आणि प्री-वेडिंग फंक्शन्सची जबाबदारी घेतल्याचे म्हटले जात आहे.

आणखी वाचा : पाकिस्तानी गायकाने दुबईत लतादीदींना वाहिली श्रद्धांजली, व्हिडीओ पाहून नेटकरी करतायत स्तुती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फरहान आणि शिबानी गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. दरम्यान, फरहानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचे नाव अधुना अख्तरअसून त्यांची २ मुले आहेत. अधुना आणि फरहान यांचे २००० साली लग्न झाले होते. तर १७ वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तर २०१९ मध्ये शिबानी आणि फरहान रिलेशनशिपमध्ये आले.