अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तरने देशभरात सुरू असलेले लोकसभा निवडणूक २०१९ संदर्भात काही ट्विट केले होते. या ट्विटमध्ये फरहानने भोपाळच्या मतदरांना १९ मे रोजी मतदान करण्यास सांगितले होते. परंतु भोपाळमधील मतदान हे १२ मे रोजी पार पडले होते. वास्तविकतेचा विचार न करता फरहानने भोपाळच्या मतदारांना मतदान करण्यास सांगितल्याने सोशल मीडियावर तो ट्रोल झाला होता. आता फरहानने ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
‘मी एक तारिख चुकीची काय समजली तर माझा धरेवर धरले. पण ज्यांनी इतिहास चुकीचा समजला त्यांना तुम्ही मिठी मारताय’ असे फरहानने ट्विटमध्ये लिहिले आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. फरहानचा या ट्विटमधून अप्रत्यक्षपणे कोणत्यातरी राजकीय पक्षाला टोला असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
Humne taareek galat samjhi toh galaa pakad liya,
Jisne itihaas galat samjha use galey laga rahe ho. #priorities— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) May 19, 2019
फरहान आणि शिबानी दांडेकर हे दोघंही या वर्षांत विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ही जोडी आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे वारंवार चर्चेत आहे. शिबानी आणि फरहान अनेकदा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात, तेव्हापासून या दोघांच्या नात्याची चर्चा सुरू आहे.