उर्दू कवी, गीतकार साहिर लुधियानवी आणि प्रसिध्द लेखिका अमृता प्रीतम यांची अनवट प्रेमकहाणी लवकरच रूपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. साहिर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून त्यांच्या भूमिकेसाठी फरहान अख्तरचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
आशी दुआ निर्मित या चित्रपटात आपल्याला अमृता प्रीतम यांच्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली असल्याचे करिना कपूरने सांगितले. सध्या आपण या चित्रपटाची पटकथा वाचत असून या कथेचा गाभा समजून घेण्याच्या प्रक्रियेत आहोत, असे करिनाने म्हटले आहे. साहिर यांच्या भूमिकेसाठी मात्र, प्रत्यक्षातही गीतकार असणाऱ्या अष्टपैलू अभिनेता फरहान अख्तरची निवड करण्यात आली आहे.