‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. अभिनेता आमिर खाननं पत्नी किरण रावपासून घटस्फोट घेतल्यानंतर फातिमाचं नाव आमिर खानसोबत जोडलं जात आहे. एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वी या दोघांचा एक फोटोही व्हायरल झाला होता. या फोटोमुळेच दोघांनी गुपचूप लग्न केल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण नंतर हा फोटो एडिट केलेला असल्याचं समोर आलं. पण आता फातिमा पुन्हा एकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
फातिमा सना शेखनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यावरून तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. फातिमानं चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत इन्स्टाग्रामवर एक टॉपलेस फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये फातिमा खूपच सुंदर दिसत आहे. पण काही युजर्सनी मात्र तिच्या या फोटोवरून तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
फातिमाच्या या फोटोचं तिच्या चाहत्यांनी कौतुक केलं आहे. पण काही युजर्सनी थेट आमिर खानचं नाव घेत तिची खिल्ली उडवली आहे. फातिमाच्या फोटोवर कमेंट करताना एका युजरनं लिहिलं, ‘तू आमिरशी लग्न करतेयस?’ याशिवाय इतरही काही युजर्सनी फातिमाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात सोशल मीडियावर अशाप्रकारे ट्रोल होण्याची फातिमाची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही तिला अनेकदा आमिर खानमुळे ट्रोल केलं गेलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी फातिमा आणि आमिरचा एक फोटो व्हायरल झाल्यानं त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. आमिर खाननं फातिमाशी तिसरं लग्न केल्याचंही बोललं गेलं होतं. पण नंतर हा फोटो नकली असल्याचं समोर आलं. हा फोटो एडिट करण्यात आला होता. ज्यात आमिर आणि सना लग्नाच्या वेशात दिसत होते. आमिर खानच्या घटस्फोटानंतर फातिमाचं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे.