अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. तिच्या वागण्या बोलण्याने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. पूनम आपले बोल्ड फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. पण सध्या पूनम एका वेगळ्याच कारणाचे चर्चेत आली आहे. पूनमच्या राहत्या घरी भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीमुळे पूनमच्या घराचे मोठे नुकसान झालं आहे.
हेही वाचा- वयाच्या ५५ व्या वर्षीही किशोरी शहाणे इतक्या फिट कशा? खास फिटनेस टिप्स शेअर करत म्हणाल्या…




मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा घराला आग लागली तेव्हा पूनम पांडे घरी नव्हती. आग लागल्यानंतर सोसायटीतील एका मुलाने अग्निशमन दलाला फोन केला. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. अद्याप आग लागण्यामागचे नेमके कारण कळाले नसले तरी एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मोलकरणीने वाचवला पूनमच्या पाळीव श्वानाचा जीव
जेव्हा घरात आग लागली तेव्हा पूनमचा पाळीव श्वास घरात होता. पूनमच्या मोलकरणीने त्या श्वानाला आगीतून वाचवल्याचे सांगण्यात येते. या आगीत पूनमच्या घरातील सामान जळून खाक झालं आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट शेअऱ केली आहे. या पोस्टमध्ये आगीमुळे पूनमच्या घराचे नुकसान झाल्याचे फोटो शेअर केले आहेत.
हेही वाचा- “खुपते तिथे गुप्ते १६ भागांमध्येच संपत आहे कारण…”, अवधूत गुप्तेने केला खुलासा
पूनमच्या घरचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. अनेक युजर्सनी कमेंट करून चिंता व्यक्त केली आहे. एका यूजरने लिहिले की, ‘देवाचे आभार की कुटुंबातील सदस्य आणि त्यांचा पाळीव श्वान सुरक्षित आहे.’ दुसर्या यूजरने लिहिले की, ‘देवाच्या कृपेने मोलकरीण तिथे आली आणि श्वानाला वाचवले.’ दुसरीकडे अनेकांनी पूनमला ट्रोलही केले आहे.