Dalljiet Kaur Went on Fitness Journey and Shared Video : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर बऱ्याच दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पहिल्या लग्नात अपयश आल्यावर तिनं निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं. पण, तिचं दुसरं लग्न वर्षभरही टिकलं नाही.

दलजीत कौरचे वैयक्तिक आयुष्य खूप चर्चेत राहिले आहे. शालीन भनोतरोबरचे तिचे पहिले लग्न मोडले आणि नंतर केनियातील उद्योगपती निखिल पटेलशी लग्न केल्यानंतर तिची फसवणूक झाली.

पण, आता दलजीत कौरने सोशल मीडियावर तिचा फिटनेस प्रवास पुन्हा सुरू करताना एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याबरोबरच तिने सांगितले की, गेल्या एका वर्षात तिच्या आयुष्यात अनेक भावनिक चढ-उतार आले, ज्यामुळे ती फिट राहण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू ठेवू शकली नाही.

फिटनेसचा व्हिडीओ केला शेअर

दलजीतने तिचा वर्कआउट व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती जिममध्ये तिच्या पाठीचा आणि पायांचा व्यायाम करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले आहे, “गेल्या एक वर्षात मी अनेक वेळा तंदुरुस्त होण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु जीवनातील गुंतागुंत, व्यग्र दिनचर्या व भावना मला नेहमीच मागे खेचत राहिल्या. यावेळी मी ठरवलं आहे की, आता कोणतंही निमित्त चालणार नाही आणि मला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल.”

तिने सांगितले की, फिटनेससाठी तिने एक उत्तम प्रशिक्षक निवडला आहे, ज्याला ती तिची शेवटची आशा मानते. ती म्हणाली, “माझा प्रशिक्षक व्यायामाच्या बाबतीत खूप कडक आहे. योग्य निकाल मिळविण्यासाठी तो वेगवेगळ्या प्रशिक्षण पद्धती वापरतो. प्रत्येक व्यक्तीच्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे योग्य निकाल मिळविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनुसार योग्य आहार आणि व्यायाम करावा लागतो.”

दलजीत म्हणाली की, आता मला फक्त शरीरच दुरुस्तच करायचं नाही, तर स्वतःला आतून दुरुस्तही करायचं आहे. दलजीत म्हणाली, “हा प्रवास आता सुरू झाला आहे आणि मी तुमच्याबरोबर प्रत्येक पाऊल जसं आहे तसं, कोणतंही ढोंग न करता, पूर्ण प्रामाणिकपणे शेअर करेन. आता व्यायामानं तुमचं जीवन सुधारण्याची वेळ आली आहे.”

दलजीतने मार्च २०२३ मध्ये निखिल पटेलशी लग्न केले आणि ती केनियाला गेली. पण, जानेवारी २०२४ मध्ये तिचा मुलगा जेडनबरोबर ती भारतात परतली. हे तिचे दुसरे लग्न होते, जे मोडले. यापूर्वी तिने अभिनेता शालिन भानोतशी लग्न केले होते. या लग्नापासून तिला एक मुलगा झाला, ज्याचं नाव जेडन आहे. परंतु, २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आणि ते वेगळे झाले. त्यानंतर तिने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.