महेश मांजरेकरच्या दिग्दर्शनातील सर्वात मोठी ताकद व वैशिष्ट्य भावनिक कथा-पटकथेच्या हाताळणी आणि सादरीकरणात आहे हे ‘आई’, ‘निदान’, ‘वास्तव’, ‘काकस्पर्ष’, ‘नटसम्राट’ अशा चित्रपटातून सिद्ध झालयं . याच पठडीतील त्याचा आणखीन एक चित्रपट म्हणजे, ‘तेरा मेरा साथ रहे’ (२००१).

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण चित्रपट भावनिक असला तरी सेटवर ‘खेळ’कर वातावरणात चित्रीकरण केल्यास ते अधिक वेधक होते यावर महेश मांजरेकरचा खास विश्वास. या चित्रपटासाठी कमालिस्तान स्टुडिओत खूपच मोठा असा मध्यमवर्गीय चाळीचा सेट लावला होता व त्यातच पटांगण होते. चित्रीकरणाच्या लंच ब्रेकमध्ये स्वतः मांजरेकर बॅट घेऊन किक्रेट खेळण्यास सज्ज. तर कधी कॅरम आहेच. हे या सेटवर गेल्यावर अनुभवता आले व मांजरेकर आपल्या युनिटला चार्ज कसे करतात याचेच जणू उत्तर मिळाले. अशा भावनिक चित्रपटासाठी तर ते आवश्यकच असते.
ही दोन भावांची गोष्ट. धाकटा भाऊ ( दुष्यंत वाघ) ‘cerebral palsy’ या विकाराने ग्रस्त असून मोठ्या भावावर ( अजय देवगण) या भावाच्या पालनपोषण व भवितव्याची जबाबदारी आहे. हे नाते घट्ट आहे आणि त्याभोवती मोठ्या भावाचे प्रेम प्रकरण ( सोनाली बेन्द्रे) आहे. इतरही काही नाट्यमय घडामोडी आहेत पण मुख्य धागा दोन भावांचे नाते. यासह काही चाळकरी वगैरे गोष्टी आहेतच. महेश मांजरेकरचा चित्रपट म्हणजे अनेक मराठी कलाकारांना संधी हवीच. रिमा लागू, शिवाजी साटम, आनंद अभ्यंकर, किशोर नांदलस्कर, सायली शिंदे, स्वप्नील कांबळे… यासह नम्रता शिरोडकर, प्रेम चोप्रा यांच्याही भूमिका यात आहेत. व्ही. एन. मयेकर यांचे संकलन होते. एन. आर. पचिसिया या चित्रपटाचा निर्माता होता. तो, महेश मांजरेकर व अजय देवगण असे त्रिकूट या चित्रपटाच्या निमित्ताने जमले हे विशेषच. अजय देवगण आपल्या ‘गुंडा हिरो’ या प्रतिमेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असतानाच हा महत्त्वाचा चित्रपट होय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flashback by dilip thakur hindi movie tera mera saath rahe mahesh manjrekar ajay devgan
First published on: 25-08-2017 at 04:35 IST