बॉलिवूडचा दबंग खान सलमान येत्या २७ डिसेंबरला पन्नास वर्षांचा होत आहे. आता त्याचा पन्नासावा वाढदिवस असल्यामुळे त्याच्या घरी जंगी सेलिब्रेशन असेल यात शंका नाही. मात्र, त्याचे चाहत्यांचाही उत्साह काही कमी नाही आहे.
सॅण्ड आर्टिस्ट तसेच सलमानचा चाहता असलेल्या राहुल आर्या याने एक खास व्हिडिओ तयार केला आहे. यात राहुलने सॅण्ड आर्टद्वारे अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहुलने २०० सेकंदाच्या या सॅण्डआर्टमध्ये सलमानच्या जन्मापासून ते आतापर्यंतचा संपूर्ण जीवनप्रवास उलगडला आहे.
राहुल त्याच्या सँडआर्टसाठी खूप प्रसिद्ध आहे. त्याचे पॅरीस हल्ला आणि बॉलिवूडला पूर्ण झालेले १०० वर्ष यावर केले गेलेले सॅण्डआर्ट सर्वत्र कौतुकाचा विषय ठरले होते.
संग्रहित लेख, दिनांक 26th Dec 2015 रोजी प्रकाशित
पाहाः ‘त्याने’ २०० सेकंदात रेखाटला सलमानचा जीवनप्रवास
राहुलने सॅण्ड आर्टद्वारे सलमानला अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 26-12-2015 at 01:10 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: From abdul rashid salim salman khan to salman bhai watch 50 years of salman khan in 200 seconds