scorecardresearch

Premium

‘फ्रॉम प्रेम दिलवाले टू राज दिलवाले’; सलमान आणि शाहरूखकडून एकमेकांच्या चित्रपटांचे प्रमोशन

शाहरूख आणि सलमानकडून करण्यात आलेल्या या एकमेकांच्या चित्रपटांच्या प्रमोशनची चर्चा सध्या सोशल मिडीयावर चांगलीच रंगली आहे.

Salman Khan,shahrukh khan,शाहरूख खान,सलमान खान
सध्या बॉलीवूड इंडस्ट्रीला शाहरूख आणि सलमानच्या 'दिलवाले' आणि 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटांबद्दल प्रचंड उत्सुकता आहे

सध्या बॉलीवूड इंडस्ट्रीला शाहरूख आणि सलमानच्या ‘दिलवाले’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटांबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. ऐन दिवाळीत हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार असून गेल्या काही दिवसांपासून ‘दिलवाले’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’चे प्रमोशन जोरात सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांमध्ये तगडी स्पर्धा असली तरी दोन्ही चित्रपटांच्या नायकांनी मात्र एकमेकांच्या चित्रपटांतील गाण्यावर नृत्य करून धम्माल उडवून दिली आहे. शाहरूख आणि सलमानकडून करण्यात आलेल्या या एकमेकांच्या चित्रपटांच्या प्रमोशनची चर्चा सध्या सोशल मिडीयावर चांगलीच रंगली आहे.
सलमान खान आणि ‘प्रेम रतन धन पायो’च्या टीमने शाहरूख खानच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ चित्रपटातील ‘तुझे देखा तो ये जाना सनम’ या सुप्रसिद्ध सुरावटीवर नृत्य करतानाचा व्हिडिओ ट्विटरवर अपलोड केला. ‘फ्रॉम प्रेम दिलवाले टू राज दिलवाले’ या शीर्षकाखाली सलमानने हे दोन व्हिडिओ ट्विटरवर अपलोड केले.


हे व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेचच शाहरूख खान आणि ‘दिलवाले’च्या टीमने ‘प्रेम रतन धन पायो’मधील टायटल ट्रॅकवर नृत्य करतानाचा व्हिडिओ ट्विटरवर अपलोड केला. या व्हिडिओत शाहरूखसोबत किर्ती सनोन, वरूण धवन आणि वरूण शर्मा हेदेखील दिसत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-11-2015 at 13:59 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×