सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. प्रत्येक जण आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आतुर झाले आहेत. करोनानंतर दोन वर्षांनी गणपती बाप्पाचे थाटामाटात जल्लोषात आगमन होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे यंदा सर्वत्रच बाप्पाची आरास, प्रसाद, डेकोरेशन आणि सर्व तयारी जय्यत केली जात आहे. सध्या सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत सर्वत्र लगबग सुरु झाली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ते स्वत:च्या हाताने गणपती बाप्पाची मूर्ती घडवताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रवी जाधव यांच्याकडे दरवर्षी गणपती बाप्पा विराजमान होत असतात. यंदाही त्यांच्याकडे गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. या निमित्ताने त्यांच्या जय्यत तयारी सुरु आहे. नुकतंच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर याचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते स्वत:च्या हाताने बाप्पाची मूर्ती घडवताना दिसत आहेत.
आणखी वाचा : Liger Movie Review : ना धड लायन, ना टायगर; जबरदस्ती जुळवून आणलेला अन् एक फिस्कटलेला प्रयोग म्हणजे ‘लाइगर’

या व्हिडीओला त्यांनी हटके कॅप्शनही दिले आहे. “आपला बाप्पा आपणच घडविण्याइतका दुसरा आनंद नाही!!! गणेशोत्सवाचे मंतरलेले १० दिवस आता जवळ आले आहेत. संपुर्ण महाराष्ट्राप्रमाणे आमचीही तयारी जोरात सुरु आहे. अजून रंगकाम बाकी आहे. ते झाल्यावर नक्कीच शेअर करीन!!! गणपती बाप्पा मोरया”, असे त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे.

आणखी वाचा : बॉयकॉट ट्रेंडच्या वादात स्वप्निल जोशीची उडी, रणवीर आणि अर्जुनचा फोटो शेअर करत म्हणाला “खऱ्या अर्थाने सुपरस्टार…”

दरम्यान मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार त्यांच्या हाताने गणरायाची मूर्ती घडवताना दिसतात. त्यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांप्रमाणे कलाकारांमध्येही गणेशोत्सवाचे रंग चढू लागल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच सिनेसृष्टीतील कलाकार मंडळीही बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाल्याचं दिसून येत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganeshotsav 2022 ravi jadhav ganpati idol making video viral on social media nrp
First published on: 26-08-2022 at 09:27 IST