scorecardresearch

Premium

एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? रॅपिड फायर प्रश्नावर गौतमी पाटील म्हणाली, “मला…”

Gautami Patil: एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? गौतमी पाटीलचं भन्नाट उत्तर, काय म्हणाली? वाचा

gautami patil eknath shinde udhhav thackeray
(गौतमी पाटील, एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे)

आपल्या डान्समुळे राज्यभर चर्चेत असणारं नाव म्हणजे गौतमी पाटील होय. गौतमीचे राज्यभरात असंख्य चाहते आहेत, पण तिच्या काही डान्स व्हिडीओंनंतर तिच्यावर अश्लील डान्स करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला, त्यामुळे तिला माफीही मागावी लागली, तसेच लोकांच्या रोषालाही सामोरं जावं लागलं. पण तिने त्यात आपण सुधारणा केली असल्याचं तिने म्हटलं होतं.

भर कार्यक्रमात पालकांचा दत्तक मुलगा असल्याचं कळालं अन्…; ‘Indian Idol’चा विजेता म्हणाला, “आयुष्यातील हे वास्तव…”

prajakata mali visit sri sri ravishankar gurudev ashram in bangalore
“कलाकार फार दु:खी असतात…”, प्राजक्ता माळी पोहोचली बंगळुरूच्या आश्रमात; श्री श्री रविशंकर यांना विचारला ‘तो’ प्रश्न
What Arun Yogiraj Said?
“मधुर हास्य, बालपणीचा चेहरा, रोज येणारं माकड..”, रामलल्लाची मूर्ती साकारताना काय घडलं? अरुण योगीराज काय म्हणाले ?
pravin tarde perform prabhu shri ram pran pratishtha pooja at home
Video : “प्रभू तुमचे स्वागत असो!” प्रवीण तरडेंनी केली प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा; पत्नी म्हणाली, “कलियुगातील…”
Swami Govind Dev Giri Maharaj Pm Narendra modi
पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना; गोविंदगिरी महाराज म्हणाले, “श्रीमंत योगी…”

गौतमी तिच्या डान्ससह वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिची कौटुंबीक पार्श्वभूमी, तिचं शिक्षण, तिचे पालक या गोष्टींबद्दल तिच्या चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता असते. अशातच आपल्याला जबाबदाऱ्या उचलणारा आणि समजून घेणारा मुलगा हवा आहे, असं तिने ‘दॅट ऑड इंजिनिअर’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. या मुलाखतीत तिने आयुष्यातील कठीण प्रसंगाचा खुलासा केला.

मृणाल ठाकूरचे बिकिनीतील फोटो पाहून संतापले नेटकरी; म्हणाले, “फॉलोअर्स वाढवण्यासाठी…”

गौतमीने तिचा आवडता खाद्यपदार्थ, फिरायला कुठे जायला आवडतं, अशा आवडी-निवडीबद्दल सांगितलं. तिला पुरणपोळी खायला खूप आवडते आणि फिरण्यासाठी समुद्रकिनारे आवडतात, असं गौतमीने सांगितलं. यावेळी तिला रॅपिड फायरमध्ये एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, असा प्रश्न विचारण्यात आला. तिला दोन्हीपैकी एक नाव निवडायचं होतं. पण तिने त्यावर उत्तर देणं टाळलं. तसेच ‘तू मला मार खायला लावणार की तू माझा मार खाणार’, असं ती हसत अँकरला म्हणाली.

दरम्यान, गौतमी यावेळी तिच्या व्हायरल व्हिडीओबद्दलही बोलली. तो व्हिडीओ आपण स्वतः आईला पाठवला आणि असं घडलंय ते सांगितलं. तिला इतरांकडून कळालं असतं तर जास्त त्रास झाला असता, असंही ती म्हणाली. कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खूप खचली होती, पण जवळच्या लोकांनी धीर दिला व सांभाळून घेतलं, असं तिने नमूद केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gautami patil answer on rapid fire question about eknath shinde uddhav thackeray hrc

First published on: 05-04-2023 at 13:23 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×