सुट्टीचे दोन महिने म्हणून एप्रिल-मे महिन्यांत अनेक मराठी-हिंदी चित्रपट प्रदर्शनासाठी तयारीत असतात. मात्र गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘द केरला स्टोरी’ने सगळय़ांचीच झोप उडवली. इतर कोणत्याही हिंदी चित्रपटांसारखा फारसा गाजावाजा न करता प्रदर्शित झालेल्या ‘द केरला स्टोरी’ने पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांची गर्दी खेचून घेतली. त्यामुळे त्यानंतर महिनाभर कोणत्याही हिंदी चित्रपटाला चित्रपटगृहात फारसे चांगले शो मिळाले नाहीत. या सगळय़ाचा मोठा फटका नेहमीप्रमाणे मराठी चित्रपटांना बसला आणि त्यांचे प्रदर्शन पुढे गेले. मुळात जून-जुलै महिन्यात मोठय़ा हिंदी चित्रपटांनी आपल्या प्रदर्शनाच्या तारखा आधीच जाहीर केल्या असल्याने गेल्या महिन्यात रखडलेले मराठी चित्रपट आणि नवे हिंदी चित्रपट असे दर आठवडय़ाला चार ते पाच चित्रपट पाहण्याची वेळ प्रेक्षकांवर आली आहे.‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात प्रदर्शित झाला. त्यावेळी ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट आधीपासूनच चित्रपटगृहात सुरू होता. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘द केरला स्टोरी’बरोबर ‘बलोच’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला, तर त्याआधी ‘टीडीएम’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र चित्रपटगृह मिळत नाही म्हणून हा चित्रपट चित्रपटगृहातून काढून घेण्यात आला. याशिवाय, ‘रावरंभा’, ‘फकाट’ आणि देवेंद्र गायकवाड दिग्दर्शित ‘चौक’ असे तीन चित्रपट ओळीने मे महिन्यात प्रदर्शित होणार होते. त्यापैकी ‘रावरंभा’ या चित्रपटाने सुरुवातीलाच मराठी चित्रपटांशीच स्पर्धा नको म्हणून आपल्या प्रदर्शनाची तारीख १२ मे वरून २६ मे केली होती. हा चित्रपट ठरल्याप्रमाणे प्रदर्शित झाला. मात्र पुढे गेलेले दोन्ही ‘फकाट’ आणि ‘चौक’ हे मराठी चित्रपट जूनच्या पहिल्या आठवडय़ात प्रदर्शित झाले आहेत. याशिवाय, मीरा वेलणकर दिग्दर्शित ‘बटरफ्लाय’ हा मराठी चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. एकाचवेळी दोन-तीन मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, हॉलीवूडपट आणि हिंदीतील नवे मोठे चित्रपट अशी एकच गर्दी जून-जुलै महिन्यात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

गेल्या महिन्यात रखडलेल्या मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांना जूनच्या पहिल्या दोन आठवडय़ांत चित्रपट प्रदर्शित करणे गरजेचे होऊन बसले आहे, त्याचे कारण जून महिन्यात तीन बहुचर्चित हिंदी मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. शिवाय, ह़ॉलीवूडमधीलही मोठे चित्रपट प्रदर्शित होण्याचा सिलसिला जून महिन्यातही सुरू राहणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’, अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘मैदान’ आणि समीर विद्वांस या मराठमोळय़ा दिग्दर्शकाचा पहिला हिंदी चित्रपट ‘सत्यप्रेम की कथा’ हे तीन मोठे हिंही चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित होणार आहेत. याशिवाय, पहिल्या आठवडय़ात प्रदर्शित झालेल्या ‘स्पायडर मॅन : अक्रॉस द स्पायडर वर्स’ या चित्रपटासह ‘ट्रान्सफॉर्मर्स : राईज ऑफ द बीस्ट्स’ आणि ‘द फ्लॅश’ हे हॉलीवूडपटही प्रदर्शित होणार आहेत.

Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
A new storyline series for the audience on the occasion of Gudi Padwa 2024
गुढी नव्या मालिकांची

मराठी चित्रपटांना पुन्हा प्रतीक्षा..

जून-जुलैमध्ये आधीच मोठय़ा चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या असल्याने गेल्या महिन्यात रखडलेले बहुतांशी मराठी चित्रपट जूनमध्ये पहिल्या दोन आठवडय़ांत प्रदर्शित होणार आहेत. तर काही मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा चांगल्या तारखांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. जूनमध्ये दुसऱ्या आठवडय़ातही ‘मुसंडी’, ‘अम्ब्रेला’ आणि ‘टीडीएम’ हे तीन मराठी चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित होणार आहेत. यानंतर रोहित शेट्टीची पहिलीवहिली मराठी निर्मिती असलेला ‘बॅक टु स्कूल’ हा चित्रपट प्रदर्शित होईल आणि जूनच्या अखेरच्या आठवडय़ात केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सुट्टी संपवून शाळा-महाविद्यालयात रमलेली मुले आणि पालकांचेही व्यग्र वेळापत्रक पाहता प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत आणणे हे आव्हान यावेळी सगळय़ाच निर्मात्यांसमोर असणार आहे.