सध्या बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याचा आगामी चित्रपट ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात अक्षय कुमार पोलिस आधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहीत शेट्टी करणार असून अक्षय कुमार आणि रोहीत शेट्टी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. आता ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत कोण दिसणार याचा खुलासा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलिवूडमध्ये ‘बॅड मॅन’ म्हणून लोकप्रिय असणारे अभिनेते म्हणजे गुलशन गोवर. गुलशन ग्रोवर ‘सूर्यवंशी’ चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु खुद्द गुलशन यांनी याचा खुलासा केलेला नाही. गुलशन हे रोहित शेट्टीचे खूप मोठे चाहते आहेत. तसेच त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये रोहीत शेट्टीसारखे टेकनिकल ज्ञान असणारे दिग्दर्शक फार कमी पाहिले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुलशन यांची चित्रपटातील भूमिका फार वेगळी असणार आहे. एक असा व्यक्ती जो सर्वांसमोर वाईट असूनही स्वत:ला चांगला व्यक्ती मानत असतो. चाहते गुलशन यांना खलनायकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी फार आतुर आहेत.

या चित्रपटात अक्षय कुमारसह अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तब्बल १० वर्षांनंतर अक्षय आणि कतरिना एकत्र काम करणार आहेत. दरम्यान ‘सूर्यवंशी’च्या सेटवरील अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये ‘सिम्बा’, ‘सिंघम’मधील अजय देवगण, रणवीर सिंह हे कलाकारदेखील झळकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gulshan grover is doing negative character in sooryavanshi movie abv
First published on: 06-06-2019 at 14:22 IST