ए. आर. रेहमान यांच्या ‘मसक्कली’ या गाण्यावरुन सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. टी सीरिजने या गाण्याचे रिमेक वर्जन तयार केले. हे गाणं प्रेक्षकांना फारसं आवडलेलं नाही. या गाण्यावर खुद्द ए. आर. रेहमान यांनी दखील टीका केली होती. त्यामुळे आता ओरिज्नल विरुद्ध रिमेक अशा एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. या वादात बॉलिवूड दिग्दर्शक हंसल मेहता यांनी देखील उडी घेतली आहे. जुन्या गाण्यांचे रिमेक ऐकणं त्वरीत थांबवा अशी विनंती त्यांनी रसिकांना केली आहे.

नेमकं काय म्हणाले हंसल मेहता?

“सर्व रसिकांना एक विनंती आहे की, त्यांनी जुन्या गाण्यांचे रिमेक ऐकणं त्वरित थांबवावं. कारण जो पर्यंत तुम्ही रिमेक ऐकण्याचं थांबवणार नाही, तो पर्यंत या कंपन्या त्यांचे रिमेक बनवतच राहणार.” अशा आशयाचे ट्विट हंसल मेहता यांनी केले आहे. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

काय म्हणाले होते ए. आर. रेहमान?

“मसक्कली हे गाणं तयार करण्यासाठी आम्ही कुठलाही शॉटकर्ट घेतला नाही. कित्येक रात्र विचार करुन २०० पेक्षा अधिक संगीतकारकांशी चर्चा करुन या गाण्याची निर्मिती केली आहे. तब्बल ३६५ दिवस आम्ही या गाण्यावर काम करुन एका अजरामर गाण्याची निर्मिती आम्ही केली होती. त्यामुळे ओरिज्नल गाण्याचाच आनंद घ्या.” अशा आशयाचं ट्विट करुन ए. आर. रेहमान यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

‘दिल्ली ६’ हा चित्रपट २००९ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील ‘मसक्कली’ हे गाणं सुपहिट ठरले होते. या गाण्याची निर्मिती ऑस्कर पुरस्कार विजेता संगीतकार ए. आर. रेहमान यांनी केले होते. तसेच गाण्याचे बोल प्रसून जोशी यांनी लिहिले होते.