अभिनेत्री हंसिका मोटवानी हिने बालकलाकार म्हणून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आणि तिला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. ‘शाका लाका बूम बूम’ या मालिकेत ती ‘करुणा’ ही व्यक्तिरेखा साकारताना दिसली. त्याचप्रमाणे हृतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटातही ती झळकली. पण २००७ साली तिला हिमेश रेशमियाच्या ‘आप का सुरूर’मध्ये पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले. कारण ती अचानक मोठी दिसू लागली होती. तेव्हा यावर विविध चर्चा रंगल्या होत्या. आता त्यावर अनेक वर्षांनी हंसिकाने भाष्य केलं आहे.
हंसिका तिच्या कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत राहिली आहे. २००७ साली जेव्हा तिने हिमेश रेशमियाच्या ‘आप का सुरूर’मध्ये काम केलं तेव्हा ती तिच्या वयाच्या मानाने मोठी दिसू लागली होती. त्यामुळे तिच्या आईने तिला मोठं दिसण्यासाठी हार्मोनल इंजेक्शन्स दिलं असल्याचं बोललं जाऊ लागलं होतं. या सगळ्याला अनेक वर्षं लोटली. आता अखेर हंसिकाने स्वतः हार्मोनल इंजेक्शनच्या अफवांचा विषय काढत सध्या लग्नावरून होणाऱ्या ट्रोलिंगबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ही सर्व माहिती निराधार असल्याचे हंसिकाचे म्हणणे आहे. मी हार्मोनलवाढीचे कोणतेही इंजेक्शन घेतलेले नाही. माझ्या शरीरात जे काही बदल झाले ते अगदी नैसर्गिक पद्धतीने झाले असल्याचे हंसिकाने म्हटले आहे.
हार्मोनलवाढीचे इंजेक्शन घेण्याच्या प्रश्नावर बोलताना हंसिकाची आई मोना मोटवानी म्हणाली, ” ही सगळी माहिती खोटी आहे. सुरुवातीला अशा गोष्टींमुळे हंसिका दुःखी व्हायची. पण आता या गोष्टींनी तिला फारसा फरक पडत नाही. हंसिकाने तिच्या खास मैत्रिणीचा पूर्वाश्रमीचा नवरा सोहेलशी गेल्या डिसेंबरमध्ये लग्न केलं. आता आपल्याच मैत्रिणीच्या आधीच्या पतीशी लग्न केल्याने “मैत्रिणीच्या नवऱ्याला चोरलंस” असं म्हणत नेटकरी तिला लक्ष्य करत आहेत.
हेही वाचा- बाइकने शूटिंग सेटवर जाणं अनुष्काला पडलं महागात; ‘हा’ नियम मोडल्याने वाहतूक पोलिसांनी ठोठावला दंड
हंसिकाने २००३ मध्ये तब्बूबरोबर ‘हवा’ चित्रपटातून बालकलाकार म्हणून तिने करिअरची सुरुवात केली होती. पुढे तिने ‘कोई मिल गया’, ‘जागो’, ‘हम कौन हैं’ आणि ‘अबरा का डबरा’सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय त्याने ‘शका लाका बूम बूम’, ‘सोन परी’ आणि ‘करिश्मा का करिश्मा’ यांसारख्या लहान मुलांच्या टीव्ही शोमध्येही काम केले. २००७ मध्ये हंसिकाने नायिका म्हणून पदार्पण केले. अल्लू अर्जुन स्टारर ‘देसमुदुरू’ आणि हिमेश रेशमियाचा ‘आप का सुरुर’ हा तिचा पहिला चित्रपट होता. बालकलाकार असणारी हंसिका अचानक नायिकेची भूमिका साकारू लागली. त्यामुळे हंसिकाने नक्कीच शारीरिक विकास जलद होण्यासाठी इंजेक्शन घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.