दिवाळीचा उत्साह आता शिगेला पोहोचला असून अनेकांनी आपल्या आप्तेष्टांना या सणाच्या शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. धनतेरस धनत्रयोदशीच्या निमित्ताने सोशल मीडियावरही याच विषयीच्या चर्चा आणि शुभेच्छांना उधाण आलं आहे. अनेकांनीच आपल्या कलात्मक बुद्धीला चालना देत सोशल मीडियावरुन धनत्रयोदशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून बऱ्याच सेलिब्रिटी आणि नावाजलेल्या मंडळींनी #Dhanteras असा हॅशटॅग वापरत सर्वांना सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाळूशिल्पासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुदर्शन पटनायकपासून ते रितेश देशमुखपर्यंत सर्वांनीच शुभेच्छा देणारी ट्विट केली आहेत. यामध्ये सर्वात लक्षवेधी ट्विट ठरलं ते म्हणजे अभिनेत्री अमिषा पटेलचं. अमिषाने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये लक्ष्मी सोन्याची नाणी असलेली थाळी हातात घेऊन घराच्या दरवाज्यात उभी असलेली दिसते. या फोटोतून ती घरात लक्ष्मीचं आगमन होत असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे.

माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी, अभिनेता फरहान अख्तर, अनिल कपूर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि इतरही बऱ्याच सेलिब्रिटींनी नेटकऱ्यांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेता रितेश देशमुखने मोठ्या चतुराईने त्याची निर्मिती असणाऱ्या आगामी चित्रपटाची प्रसिद्धी आणि धनत्रयोदशीच्या शुभेच्छा एकाच ट्विटमधून दिल्या आहेत. ‘हॅप्पी दिवाली…. फेणे वाली…’ असं ट्विट करत त्याने #RocketFene #FaFe27Oct असे हॅशटॅगही जोडले आहेत. उत्साही वातावरण आणि आनंददायी चेहरे पाहता सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस आणखी वाढेल यात शंकाच नाही.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy diwali 2017 akshay kumar farhan akhtar smriti irani wishes happy dhanteras
First published on: 17-10-2017 at 13:41 IST