बाबा या एका शब्दांत सारं काही सामावलं आहे. जशी आई मायेची सावली असते, तसंच वडील हे आधाराचा वटवृक्ष असतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात जितकं आईला महत्त्व आहे, तितकचं वडिलांनादेखील आहे. त्यामुळे मदर्स डे प्रमाणेच फादर्स डेदेखील साजरा केला जातो. वडिलांविषयी असणार प्रेम, आदर व्यक्त करण्यासाठी फादर्स डे साजरा केला जातो.त्यामुळे आजहीदेखील सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण आपल्या वडिलांना या खास दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. यात अमिताभ बच्चन यांनीही फादर्स डेच्या शुभेच्छा देत एक खास फोटो शेअर केला आहे.

बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या वडिलांचा एक फोटो शेअर केला आहे. सोबतच त्याच्या स्वत:चा देखील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बिग बी हुबेहूब त्यांच्या वडिलांप्रमाणे लिखाण काम करण्यात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे. या फोटोला त्यांनी “हमें पढ़ाओ न… रिश्तों की कोई और किताब…पढ़ी है बाप के चेहरे की… झुर्रियाँ हम ने…!!” असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, सध्या बिग बींनी शेअर केलेला हा फोटो अनेकांचं लक्ष वेधत आहे. बिग बींप्रमाणेच अनेकांनी त्यांच्या वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.