scorecardresearch

नवयुगातील मावळे ‘हरिओम’ चित्रपट लवकर येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवातच तान्हाजी मालुसरे यांच्या उमरठ या गावातून झाली.

hari om, hari om movie,
चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवातच तान्हाजी मालुसरे यांच्या उमरठ या गावातून झाली.

भगवे वादळ निर्माण करणाऱ्या मावळ्यांवर आधारित श्रीहरी स्टुडीओज प्रस्तुत ‘हरिओम’ या चित्रपट लवकरच प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. हा चित्रपट १० जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित प्रदर्शित होणार आहे. नव्या पिढीला प्रेरित करणारा ‘हरिओम’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

स्वराज्याच्या भगव्या स्वप्नातून जन्म घेणाऱ्या नव्या युगातील मावळ्यांची ही कथा आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून पोस्टर पाहून हा एक अ‍ॅक्शनपट असल्याचे कळते. या पोस्टरवर भारदस्त शरीरयष्टी असलेल्या दोन तरुणांचा चेहरा दिसत असून या दोघांच्या डोळयांत स्वप्न पूर्ण करण्यासाठीची आग दिसत आहे.

आणखी वाचा : व्हायरल मीम फेम अभिनेत्री कॅलिया पोसीचे वयाच्या १६ व्या वर्षी झाले निधन

आणखी वाचा : मेहूणीचा हात पकडून नवरदेवाने केले असे काही ‘ते’ दृश्य कॅमेऱ्यात झाले कैद

या चित्रपटाबद्दल निर्माता,अभिनेते हरिओम घाडगे म्हणतात,” मी स्वतः कोकणचा असल्याने या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण हे कोकणातील आहे. चित्रीकरणाची सुरुवातच तान्हाजी मालुसरे यांच्या उमरठ या गावातून झाली आहे. त्यामुळे अ‍ॅक्शनबरोबरच कोकणातील निसर्गसौंदर्यही प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. हा माझा पहिला मराठी चित्रपट असून नव्या पिढीला प्रेरित करणारा हा चित्रपट आहे. अनेक महिन्यांपासून ‘हरिओम’च्या प्रदर्शनाची उत्सुकता होती अखेर आता ‘हरिओम’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. करोना काळात अनेक अडचणींवर मात करत हा चित्रपट बनवण्यात आला आहे. महामारीच्या काळात अनेकांना रोजगार देण्याचे काम, काही सामाजिक उपक्रम या चित्रपटाच्या टीमच्या माध्यमातून राबवण्यात आले. आपण समाजाचे काही देणे लागलो, ही एकच भावना यामागे होती. अथक प्रयत्नानंतर आता ‘हरीओम’ पूर्णत्वाला आला आहे. प्रेक्षकांनी आपल्या कुटुंबियांसोबत हा चित्रपट नक्की पाहा.”

आणखी वाचा : ‘झुंड’ होणार ‘या’ OTT वर प्रदर्शित, सर्वोच्च न्यायालयाने दिला हिरवा झेंडा

‘हरिओम’ आशिष नेवाळकर आणि मनोज येरुणकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात हरिओम घाडगे आणि गौरव कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात हरिओम घाडगे निर्माता,अभिनेता आणि लेखक अशा तिहेरी भूमिकेत दिसणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hari om movie is going to released on this day dcp

ताज्या बातम्या