अभिनेता अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर चित्रपटसृष्टीमध्ये त्याची ओळख बनवू पाहात आहे. २०१६ मध्ये ‘मिर्झिया’ या चित्रपटाद्वारे हर्षवर्धनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण, हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकण्यात अपयशी ठरला होता. चित्रपटाच्या वाट्याला फारसे यश आले नसले तरीही हर्षवर्धन कपूरच्या चाहत्यांचा एक वेगळाच वर्ग तयार झाला असे म्हणायला हरकत नाही. ‘मिर्झिया’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारसे चांगले प्रदर्शन केले नाही. पण, हर्षवर्धनच्या अभिनयाला मात्र अनेकांनी दाद दिली होती. दरम्यान, याच हर्षवर्धनने दिलजीत दोसांजची माफी मागितली आहे. फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार न मिळाल्याने हर्षवर्धन नाराज झाला होता. हा पुरस्कार ‘उडता पंजाब’ या चित्रपटासाठी दिलजीत दोसांजला दिला गेल्यानेने हर्षवर्धनने नाराजीचा सूर आळवला होता.

गेल्या वर्षी हर्षवर्धन आणि दिलजीत दोसांज याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. हर्षवर्धन हा ‘मिर्झिया’ तर दिलजीत दोसांज ‘उडता पंजाब’ चित्रपटात झळकला होता.  ‘मला फिल्मफेअर व्यतिरिक्त इतर सर्व पुरस्कार मिळाले आहेत. काही पुरस्कारांमध्ये ज्युरी पुरस्कारांसंबंधीचे निर्णय घेतात. काही ठिकाणी लोकप्रियतेच्या निकषांवर हे ठरवले जाते. मला नाही ठाऊक या वर्षी त्यांनी हा निर्णय नेमका कसा घेतला आहे. माझ्यामते पदार्पणासाठीचा पुरस्कार हा अगदी नवख्या कलाकारालाच देण्यात यावा. मी खूप कमी चित्रपटांमध्ये काम केले आहे. दुसरीकडून असेही म्हटले जाऊ शकते की, मी १०० इंग्रजी चित्रपट केले आहेत आणि आता मी हिंदी चित्रपट करत आहे. त्यामुळे हे माझे पदार्पणच आहे. तर मग लिओनार्दो दिकेप्रियोने ऑस्कर जिंकल्यानंतर तो बॉलिवूडकडे वळला तर ते त्याचे पदार्पणच असेल. ही गोष्टच मला पटत नाही’, असे ठाम मत हर्षवर्धनने मांडले होते. त्यानंतर आपल्याला फिल्मफेअर पुरस्कार न मिळाल्याचे दुःख पचवण्यास हर्षवर्धनने बराच वेळ घेतला. मात्र, हर्षवर्धनला आता त्याची चूक उमगली असून त्याने ट्विट करून दिलजीतची माफी मागितली आहे. विशेष म्हणजे त्याने यात ट्विटमध्ये दिलजीत दोसांजसह वडील अनिल कपूर यांचेही ट्विटर हॅण्डल मेन्शन केले आहे. हर्षवर्धनने लिहलेय की, लव्ह यू टू सर. मला तुमच्याबद्दल आणि तुमच्या कामाबद्दल खूप आदर आहे. मी जे काही बोललो त्याचा चुकीचा अर्थ लागत असेल तर मी त्यासाठी तुमची माफी मागतो.

Bharat Ratna, Yashwantrao Chavan,
सातारा : यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, उदयनराजे करणार मोदींकडे शिफारस
n m joshi marg bdd chawl redevelopment
ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास; दोन वर्षांत १२६० घरांचा ताबा देण्याचे म्हाडाचे आश्वासन
Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
ayesha jhulka, High Court, Pet Dogs Killing, Ayesha Jhulka Moves High Court, Seeking Expedited Justice, ayesha jhulka pet dog killed, ayesha jhulka dog killed case, mumbai high court, mumbai news,
हत्या झालेल्या श्वानाला न्याय मिळवून देण्यासाठी अभिनेत्री आयेशा जुल्का उच्च न्यायालयात

एके ठिकाणी आपल्याला फिल्मफेअर पुरस्कार न मिळाल्याने हर्षवर्धन नाराज होता. तर दुसरीकडे हा पुरस्कार पटकावणारा पंजाबी अभिनेता दिलजीतने पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलेले की, मी दुखावलो गेलेलो नाही. मी दुःखी नाही. फिल्मफेअरने मला जो सन्मान दिला त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. मी याकरिता पुरेसा योग्य असल्याचे मला वाटत नाही. हा खूप मोठा पुरस्कार असून, त्यांनी माझ्यात नक्कीच काहीतरी पाहिलं असेल म्हणून मला पुरस्कार दिला. दिलजीत दोसांजने यापूर्वी ‘पंजाब १९८४’, ‘जाट अॅन्ड ज्युलिअट’, ‘सरदारजी- भाग १, २’, ‘अम्बरसरिया’ यांसारख्या पंजाबी चित्रपटांतून वेगळ्या धाटणीचा अभिनय सादर केला आहे. दिलजीतच्या चित्रपटांप्रमाणेच त्याची गाणीही चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. सध्या हा पंजाबी सुपरस्टार बॉलिवूडमध्ये स्थिरावू पाहात आहे. तो लवकरच अनुष्का शर्मासोबत ‘फिल्लौरी’ या चित्रपटातून झळकणार आहे.