‘काय पो छे’ अभिनेता सुशांत सिंग राजपूतने प्रेयसी अंकिता लोखंडेसोबत लग्न केल्याची चर्चा सध्या सुरु आहे. हे दोघे गेले पाच वर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते.
त्यांच्या लिव्ह इन रिलेशनशिपला घरच्यांचा विरोध होत असल्यामुळे त्यांनी लग्न केले. तसेच, दोघांच्याही करियरवर याचा परिणाम होऊ नये म्हणून त्यांच्या लग्नाची बातमी गुपित ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एका प्रसिद्ध वृत्तपत्रानुसार, मूळची इंदौरची असलेल्या अंकिताने लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घरी कळवताच घरच्यांनी तिला यास परवानगी देण्यास नकार दिला. मात्र, त्या दोघांनी लग्न करून एकत्र राहण्यास त्यांची काहीच हरकत नसल्याचे सांगितले. यावर अंकिता आणि सुशांतने उज्जैन येथे लग्न केले आणि ते मुंबईला परतले. इंदौरच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या या दोघांची भेट झाली. त्यानंतर ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी शोमध्ये सुशांतने अंकिताला प्रपोज केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jan 2014 रोजी प्रकाशित
सुशांत सिंग राजपूत-अंकिता लोखंडेचे गूपचूप लग्न!
'काय पो छे' अभिनेता सुशांत सिंग राजपूतने प्रेयसी अंकिता लोखंडेसोबत लग्न केल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
First published on: 20-01-2014 at 12:58 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Has sushant singh rajput secretly married girlfriend ankita lokhande