अभिनेत्री रिंकू राजगुरू अर्थात सैराटफेम आर्चीचा आणखी एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. मेकअप असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. या टीझरमध्ये एका उंच इमारतीतल्या घरात उभी राहून रिंकू राजगुरू दारू पिऊन बडबडताना दिसते आहे. मात्र तिच्या भाषेचा ग्रामीण बाज या चित्रपटातही कायम आहे. सैराट सिनेमानंतर रिंगू राजगुरूचा कागर हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच आपल्या भेटीला आला होता. आता नव्या सिनेमाच्या टिझरमध्ये रिंकू दारू प्यायली आहे असे दाखवण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेमारू मराठीच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनलवर हा टीझर पोस्ट करण्यात आला आहे. हा टीझर पाहून नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. सिनेमाच्या टीझरवरून रिंकू राजगुरू या सिनेमात वेगळ्या आणि हटके भूमिकेत दिसणार हे नक्की. सिनेमाचा टीझर तरी चांगला वाटतो आहे आता हा मेकअप सिनेमा नक्की असणार कसा? याची उत्सुकता ताणली गेली आहे.

मेकअप हा सिनेमा गणेश पंडित यांनी दिग्दर्शित केला आहे. त्यांनीच या सिनेमाचं लेखनही केलं आहे. बाळकडू, हिचकी यासारख्या सिनेमाचे लेखनही गणेश पंडित यांनी केलं आहे. आता रिंकू राजगुरूचा नवा सिनेमा कसा असेल हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.