सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय कपल धनुष आणि ऐश्वर्या हे चर्चेत आहे. या चर्चा त्यांनी सोशल मीडियाद्वारे घटस्फोट घेत असल्याचे सांगितल्यानंतर सुरु झाल्या आहेत. त्यांच्या या निर्णयाने अनेकांना धक्काच बसला आहे. पण त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न देखील अनेकांना सतावत आहे. आता त्यांच्या घटस्फोटाचे कारण समोर आले आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, धनुष हा त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये सतत व्यग्र असतो. तो सतत बाहेर असतो. यासर्व गोष्टींमुळे त्याला पत्नी ऐश्वर्याला वेळ देणे शक्य होत नव्हते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धनुष हा सतत कामात व्यग्र असतो. तो नेहमी कामाचा पहिले विचार करतो आणि त्याच्या जवळच्या व्यक्तींना याबाबत माहिती आहे. काही वर्क कमिटमेंटमुळे त्याने कुटुंबीयांकडे फारसे लक्ष दिलेले नाही. तो सतत शूटिंगसाठी अनेक ठिकाणी फिरत असतो. ऐश्वर्यासोबत वाद सुरु असताना देखील धनुष नवे चित्रपट साइन करत होता. विभक्त होण्यापूर्वी त्यांनी बराच विचार केला होता.
आणखी वाचा : ‘घटस्फोट सेलिब्रेट करा’, धनुष-ऐश्वर्या विभक्त होताच राम गोपाल वर्माने केले ट्वीट

कशी झाली धनुष आणि ऐश्वर्याची पहिली भेट?
२००२ मध्ये kadhal konden च्या स्क्रीनिंगच्या वेळी ऐश्वर्या आणि धनुष यांची पहिली भेट झाली होती. चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी ऐश्वर्या वडील रजनीकांत यांच्यासोबत आली होती. त्यावेळी धनुषचं परफॉर्मन्स पाहून ती त्याच क्षणी त्याच्या प्रेमात पडली होती. विशेष म्हणजे स्क्रिनिंगच्या दुसऱ्याच दिवशी ऐश्वर्याने धनुषच्या घरी पुष्पगुच्छ पाठवत त्याला संपर्कात रहा असं सांगितलं होतं.

ऐश्वर्याने मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर या दोघांची मैत्री वाढत गेली आणि त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं. त्यानंतर २००४ रोजी धनुष आणि ऐश्वर्याने घरातल्यांच्या संमतीने लग्न केलं. या दोघांचा लग्न सोहळा दाक्षिणात्य कलाविश्वातील गाजलेल्या लग्नसोहळ्यांपैकी एक होता. त्यांना दोन मुले आहेत. त्यांची नावे यात्रा आणि लिंगा असे आहे.