रानू मंडल यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हिमेश रेशमिया?, २०२२ मध्ये होणार प्रदर्शित

रानू मंडल यांनी लता मंगेशकर यांच ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं गायल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना लोकप्रियता मिळाली होती.

himesh reshmmiya ranu mandal,
रानू मंडल यांनी लता मंगेशकर यांच 'एक प्यार का नगमा है' हे गाणं गायल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना लोकप्रियता मिळाली होती.

सोशल मीडियावर प्रत्येक व्यक्ती आपल्या भावना मांडताना दिसते. आजकाल तर सोशल मीडियावरून अनेकांच करिअर झालं असून ते स्टार झाले आहेत. रेल्वे स्टेशनवर गाणे गायलेल्या रानू मंडल तर सोशल मीडियावरूनचं लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्या एका दिवसात स्टार झाल्या होत्या. रानू मंडल यांनी लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ गाणे गायले. नेटकऱ्यांनी त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल केला. त्यानंतर बॉलिवूडचा लोकप्रिय गायक हिमेश रेशमियाने रानू मंडल यांना संधी दिली. हिमेशसोबत एकदा काम केल्यानंतर रानू गायब झाल्या. आता त्यांच्या बायोपिकची चर्चा सुरु असल्याचे सांगितले जाते.

रानू यांच्या आयुष्यावर चित्रपटाची तयारी सुरु आहे. चित्रपटाचे नाव ‘मिस रानू मारिया’ असणार आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन ऋषिकेश मंडल करणार आहेत. या चित्रपटात रानू यांची भूमिका बंगाली आणि हिंदी चित्रपटामध्ये काम करणारी अभिनेत्री इशिका डे साकारणार आहे. तर ‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, इशिकाने सांगितले की चित्रपटाचे चित्रीकरण कोलकाता आणि मुंबईमध्ये होणार आहे.

आणखी वाचा : KBC 13: सौरव गांगुली आणि सेहवागला धोनीशी संबंधित ‘या’ प्रश्नाचे देता आली नाही उत्तर, घ्यावी लागली एक्सपर्टची मदत

आणखी वाचा : KBC 13: ‘या’ प्रश्नाचं उत्तर देत सौरव गांगुली आणि सेहवागने जिंकले २५ लाख; तुम्हाला उत्तर माहितीये का?

इशिका पुढे म्हणाली, ‘माझ्या दिग्दर्शकांनी मला सांगितले की त्यांनी हिमेशला याविषयी विचारले आहे. हिमेशने अजून तरी होकार किंवा नकार दिलेला नाही. परंतू ते हो बोलतील अशी आशा आहे. मी चित्रपटासाठी खूप उत्साहित आहे, पण आधी मला चित्रपटासाठी २ महिन्यात १० किलो वजन कमी करावे लागेल.’

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Himesh reshammiya approached for ranu mondal biopic release in 2022 dcp

ताज्या बातम्या