अभिनेता मनोज बाजपेयी हा त्याच्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने आतापर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केलं आहे. तो भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. नुकतंच मनोज बाजपेयीने बॉलिवूडमधील बॉयकॉट ट्रेंडवर आणि सातत्याने चित्रपट फ्लॉप ठरणे याबद्दल भाष्य केले आहे. बॉलिवूडमधील ‘एक व्हिलन रिटर्न्स’, ‘लाल सिंग चड्ढा’, ‘रक्षाबंधन’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरले आहेत. नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने यावर त्याचे मत मांडले आहे.
नुकंतच ‘बॉलिवूड बबल’शी बोलताना मनोज बाजपेयी म्हणाला, “कधी कधी वाईट घटनांचा आमच्यावर खूप प्रभाव पडतो. पण चित्रपट कधीही मरु शकत नाही. हिंदी चित्रपट कधी मरणार देखील नाही. त्यावर निश्चितपणे काही तरी तोडगा निघेल आणि ते चित्रपट पुन्हा पूर्वीसारखे प्रेक्षकांसमोर येतील. येत्या काही वर्षात हिंदी चित्रपटसृष्टीत विविध रोमांचक टप्पेही येतील, याचा मला विश्वास आहे.”
“घाईघाईत लग्न…” श्वेता तिवारीच्या वैवाहिक जीवनाबद्दल लेक पलकचा मोठा खुलासा
यावेळी त्याला बॉलिवूडमध्ये काही उणीव जाणवते का? असे विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला, “मला तरी हिंदीत कशाचीही कमतरता जाणवत नाही. आम्ही इतक्या वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहोत. आता आम्हाला फक्त अभ्यासक्रम सुधारण्याची गरज आहे. लोक आता फार स्मार्ट झाले आहेत. काही नवीन उत्तम अभिनय करणारे कलाकारही सिनेसृष्टीत येत आहेत.”
“मी जेव्हा मुंबईत कामासाठी आलो तेव्हा मला काम मिळत नव्हते. मी नेहमी आजूबाजूला असलेल्यांपैकी कोणी जेवण देतंय का? याच्या शोधात असायचो. तो काळ माझ्यासाठी अत्यंत आव्हानात्मक आणि कठीण होता. माझी तब्येत ठीक नव्हती. माझ्या खिशात पैसे नव्हते. ती चार-पाच वर्षे माझ्या कारकिर्दीतील सर्वात वाईट वर्षे आहेत, असे मी मानतो. मी नेहमीच याला दुःखद कथा असे मानतो. पण मी माझ्या कारकिर्दीच्या प्रत्येक टप्प्याचा आनंद घेतला आहे.” असे मनोज बाजपेयीने म्हटले.
व्हेंटिलेटरवर असणाऱ्या राजू श्रीवास्तव यांची सुरक्षा वाढवली, जाणून घ्या काय आहे कारण
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून तेलुगू चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यावधी रुपयांमध्ये कमाई करत आहेत. यामध्ये हिंदीमध्ये डब झालेल्या दाक्षिणात्य चित्रपटांचा अधिक समावेश आहे. आरआरआर, केजीएफ २ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. आरआरआर चित्रपटाने तर जगभरात कमाईच्याबाबतीत १ हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठला होता.