अस्तित्व, आयएनटी आणि साठे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या खुल्या हिंदूी एकांकिका स्पर्धेवर महाविद्यालयीन रंगकर्मींनी आपला ठसा उमटविला. विलेपार्ले येथील साठे महाविद्यालयाच्या नाटय़गृहात सादर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत म. ल. डहाणूकर महाविद्यालयाने सादर केलेली ‘लौट आओ गौरी’ ही एकांकिका प्रथम तर विद्याविहार येथील के. जे. सोमय्या महाविद्यालयाच्या ‘महिला हक्क संरक्षण कलम ४९८-अ’ची ‘वेटिंग रुम’ ही एकांकिका दुसरी आली.
अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून अमित जयरथ व संतोष तिवारी यांनी काम पाहिले. स्पर्धेचे यंदा नववे वर्ष होते. संपूर्ण महाराष्ट्रात खुल्या गटासाठी होणारी ही एकमेव हिंदूी एकांकिका स्पर्धा आहे. स्पर्धेतील अन्य विजेते पुढीलप्रमाणे : सवरेत्कृष्ट दिग्दर्शक- पराग ओझा, कृणाल आळवे, सुशील जाधव (लौट आओ गौरी), सवरेत्कृष्ट अभिनेता- विभव जाधव (लौट आओ गौरी), सवरेत्कृष्ट लेखक-आनंद म्हसवेकर (वेटिंग रुम), लेखनाचा विशेष पुरस्कार-ऋषिकेश जोशी (जोशी-बेडेकर महाविद्यालय-जिगरी), सवरेत्कृष्ट प्रकाशयोजना-जयदीप आपटे (लौट आओ गौरी), सवरेत्कृष्ट नैपथ्य-हर्षद, विलास (लौट आओ गौरी), सवरेत्कृष्ट संगीत-श्रेयस राजे (जिगरी).