scorecardresearch

‘देसी गर्ल’चं परदेशातही धम्माल होळी सेलिब्रेशन, निक- प्रियांकाचा रोमँटीक Video Viral

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा रोमँटिक व्हिडीओ बराच व्हायरल झाला आहे.

priyanka chopra, nick jonas, holi 2022, priyanka chopra holi celebration, nick jonas instagram, priyanka chopra video, प्रियांका चोप्रा, निक जोनस, होळी २०२२, प्रियांका निक व्हिडीओ, प्रियांका चोप्रा इन्स्टाग्राम, प्रियांका चोप्रा व्हिडीओ, प्रियांका चोप्रा होळी सेलिब्रेशन
परदेशात राहत असलेली प्रियांका तिथेही भारतीय सण साजरे करताना दिसते.

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. परदेशात राहत असलेली प्रियांका तिथेही भारतीय सण साजरे करताना दिसते. आताही प्रियांकानं लॉस एंजेलिसमध्ये पती निक जोनससोबत होळी साजरी केली. या सेलिब्रेशनचे काही व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात प्रियांका आणि निकचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतोय.

प्रियांका चोप्रानं तिच्या इन्स्टाग्रामवर होळी सेलिब्रेशनचे काही व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये ती निकला रोमँटिक अंदाजात रंग लावताना दिसत आहे. तर निकसुद्धा मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा करताना दिसत आहे. प्रियांका चोप्राचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर बरेच व्हायरलही झाले आहेत.

आणखी वाचा- Video : …अन् छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या अँकरला चिन्मय मांडलेकरनं थांबवलं

इन्स्टाग्रामवर होळी सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर करताना प्रियांकानं लिहिलं, ‘काही खास आणि मजेदार क्षण माझ्या वाट्याला आले. ज्यावेळी संपूर्ण जग भीतीच्या छायेखाली जगत आहे अशा काळात मला आशीर्वाद मिळाला. तुम्हा सर्वांना होळीच्या शुभेच्छा. माझ्या सर्व मित्रपरिवाराचे आणि कुटुंबीयांचे धन्यवाद ज्यांनी देसी अंदाजात होळी साजरी केली. या क्षणांसाठी मी स्वतःला खूपच नशीबवान मानते.’

आणखी वाचा- The Kashmir Files वर आर माधवनची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाला “मला खूप…”

याशिवाय प्रियांकानं इन्स्टाग्रामवर काही फोटो देखील शेअर केले आहेत. ज्यात ती निकला रंग लावताना, किस करताना दिसत आहे. निक जोनसनंही त्याच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वीच प्रियांका आणि निक आई-बाबा झाले आहेत. या दोघांनी सरोगसीच्या माध्यमातून बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे यंदाची होळी या दोघांसाठीही खूप खास आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Holi 2022 priyanka chopra and nick jonas romantic video goes viral mrj

ताज्या बातम्या