बॉलिवूड असो अथवा हॉलिवूड चित्रपटाच्या कथानकामध्ये मृत्यूची थरारक दृष्ये नसतील तर जणू चित्रपट पूर्ण झाला असे म्हणताच येणार नाही. चित्रपटाच्या कथानकाला न्याय देण्यासाठी योग्य अभिनेता आणि अभिनेत्री यांची निवड केल्यानंतर चित्रिकरणाच्या ठिकाणावर देखील दिग्दर्शक लक्ष देताना दिसतात. सध्याच्या घडीला चित्रपट निर्मितीवेळी अनेक तंत्राचा वापर केला जातो. चित्रपटातून वास्तवदर्शी बनविण्यासाठी चित्रपटातील गाणी किंवा अॅक्शन स्टंट यावर केले जाणारे तांत्रिक प्रयोगाच्या चर्चा आपण अनेकदा ऐकल्याही असतील. पण तुम्हाला हे माहित आहे का? की चित्रपटातील मृत्यूच्या दृष्यांचे चित्रण करणे ही सोपी गोष्ट नसते. या चित्रिकरणावरही निर्माता दिग्दर्शक यांना कठोर मेहनत घ्यावी लागते.
THE SQUIBBENING from Jay Cheel on Vimeo.
चित्रपटातील ह्रदय हेलावून टाकणारे प्रसंग कथानकाला एक वेगळे वळण देत असतात. मृत्यूच्या घटनेतील दृश्यांत आतापर्यंत टॉमॅटो सॉसचा वापर करुन रक्ताचा लांल रंग दाखविण्यात येतो हे आपण बऱ्याचदा ऐकले असेल. पण सध्याच्या घडीला अशा चित्रिकरणासाठी देखी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. या चित्रिकरणावेळीच्या विशेष तंत्रज्ञानावर घेतल्या जाणाऱ्या मेहनतीबाबत विनोदी कलाकार मार्कने एका व्हिडिओच्या माध्यमातून खुलासा केला आहे.
मार्कने आशा चित्रिकरणावेळी करावी लागणारी कसरत व्हिडिओच्या माध्यमातून मांडली आहे. यामध्ये अंगावर ‘स्कविब’चा वापर करुन अशी दृश्ये चित्रित करण्यात येतात असे दिसते. नायक किंवा खलनायकाला कपडे परिधान करण्यापूर्वी आपल्या अंगावर ‘स्कविब’ बांधण्यात येते. त्यानंतर त्यांना कपडे परिधान करण्यास सांगितले जाते. हे सर्व केल्यानंतर जेव्हा त्याच्यावर हल्ला केला जोतो तेव्हा नायक किंवा खलनायक आपल्याला रक्ताने माखलेल्या अवस्थेत दिसतो. हा व्हिडिओ चित्रपटातील रक्तपाताची दृश्ये पाहिल्यानंतर काहिंच्या मनात निर्माण होणारी भीती देखील नाहीशी करणारा असा आहे. चित्रपटातील प्रेमाच्या आनंदी प्रसंगापेक्षाही या चित्रिकरणासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते हे देखील या व्हिडिओतून दिसून येते.