बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन मागच्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे सातत्याने चर्चेत आहेत. हृतिक सध्या अभिनेत्री आणि मॉडेल सबा आझादला डेट करत आहे. या दोघांचे फोटो बरेचदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. एवढंच नाही तर सोशल मीडियावरही हे दोघं एकमेकांचेसोबतचे फोटो शेअर करताना आणि एकमेकांच्या फोटोंवर कमेंट्स, लाइक करताना दिसतात. अशात आता हृतिक रोशन लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या चर्चा होत आहेत.

सबा आझाद आणि हृतिक रोशन त्यांच्या नात्याबद्दल फार गंभीर असून दोघंही लग्नाचा विचार करत आहेत असं बोललं जातंय. आता या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे हे सांगता येत नाही मात्र ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार हृतिकच्या जवळच्या सुत्रांनी त्याच्या आणि सबा आझादच्या लग्नाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, हृतिक रोशन आणि सबा आझाद त्यांच्या नात्यात खूप खुश आहेत. एकमेकांसोबत वेळ व्यतीत करत आहेत. सुट्ट्या एन्जॉय करतात. एवढंच नाही तर सबा आणि हृतिकची पूर्वश्रमीची पत्नी सुझान खान यांच्यातही खूप चांगलं बॉन्डिंग आहे. सबा आणि हृतिकच्या मुलांमध्येही चांगली मैत्री आहे. पण लग्नाबाबत त्यांनी अद्याप काहीच ठरवलेलं नाही. त्यांना याबाबत कोणत्याही प्रकारची घाई करायची नाहीये. लग्न करावं की नाही यावर त्यांनी अद्याप विचार केलेला नाही.

आणखी वाचा- VIDEO : हातात हात घालून एंट्री केली अन्…; गर्लफ्रेंडला घेऊन पार्टीमध्ये पोहोचला हृतिक रोशन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अभिनेता हृतिक रोशन त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. सुझान खानसोबत बरीच वर्षं संसार केल्यानंतर दोघंही विभक्त झाले. पण आपल्या मुलांसाठी हे दोघं अजूनही एकत्र येतात. हृतिक काही महिन्यांपासून सबा आझादला डेट करत असून अलिकडेच दोघं लंडनला गेले होते. दोघांनी एकमेकांना एकत्रित वेळ दिला. तिथपासूनच हृतिक-सबाच्या लग्नाच्या चर्चांनी अधिक जोर धरला होता.