बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन लवकरच संजय गुप्ता दिग्दर्शित काबिल चित्रपटात झळकणार आहे. हृतिक आणि यामी गौतम यांची मुख्य चित्रपट असलेला काबिल येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. हृतिक त्याच्या या आगामी चित्रपटाची बरीच प्रसिद्धी करत आहे. त्याकरताच तो बॉलीवूड लाइफ या संकेतस्थळाच्या साइटवर मुलाखतीसाठी गेला होता. यावेळी प्रश्न उत्तराच्या ओघात हृतिकने त्याचा मोबाइल नंबर सांगितला. त्याने ९८४५२४६४६२ असा त्याचा मोबाईल नंबर असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर त्याने त्याचा घरचा पत्ता, त्याचे आवडते पदार्थ आणि यांसारख्याच काही  प्रश्नांची उत्तरे दिली. एका प्रश्नाचे उत्तर देताना त्याने तो सध्या कोणालाच डेट करत नसल्याचे सांगितले. या प्रश्न-उत्तराच्या तासात अनेक विचित्र प्रश्नांचा समावेश करण्यात आला होता. उदा. हृतिक रोशन गोरा आहे का? हृतिक रोशन उंच आहे का? हृतिक डाव्या हाताने सर्व कामे करतो का? वगैरे वगैरे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हृतिक रोशन आणि यामी गौतम्या आगामी काबिल चित्रपटाची कथा प्रेमावर आधारित आहे. चित्रपटातील मुख्य अभिनेत्री यामीच्या मृत्यूनंतर कथेमध्ये ट्विस्ट येतो. या दोघांनी अंध व्यक्तिंची भूमिका साकारली असून ते एकमेकांवर प्रेम करत असतात असे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आलेले आहे. आता लव्ह स्टोरी म्हटली की खलनायक तर आलाच पाहिजे. अभिनेता रॉनित रॉय आणि रोहित रॉय या दोघा सख्ख्या भावांनी चित्रपटात खलनायकांची भूमिका साकारली आहे.

दरम्यान, बॉक्स ऑफिसवर हृतिकचा काबिल आणि शाहरुख खानच्या रईस चित्रपटाची टक्कर पाहावयास मिळणार आहे. हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. शाहरुखसुद्धा त्याच्या चित्रपटाची दमदार प्रसिद्धी करत आहे. रईस चित्रपट २५ जानेवारीला सकाळच्या वेळेत प्रदर्शित होणार होता. तर काबिल चित्रपट हा दुपारपर्यंत प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र, आता चित्र बदलल्याचे दिसतेय. हृतिक रोशनचा काबिल चित्रपटदेखील सकाळीच प्रदर्शित होणार असल्याचे कळते. स्पॉटबॉय डॉट कॉम या संकेतस्थळाला राकेश रोशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, वितरकांनी काबिल चित्रपट सकाळी ९ वाजता प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये होणा-या धडकेबाबत ही नवी बाब आता समोर आली आहे. काबिल आणि रईस हे दोन्ही चित्रपट मोठे असून प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर एकमेकांना टक्कर देण्यास सज्ज आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hrithik roshan revealled his contact no in kaabil interview
First published on: 23-01-2017 at 08:43 IST